कोरोना लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगू नका

कोरोना लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगू नका

कोरोना लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगू नये, प्रत्येकाने लवकरात लवकर लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेत योगदान द्यावं असं पंतप्रधघान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे. ते मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. २१ जूनपासून भारतात १८ वर्षावरील सर्वांचं लसीकरण सुरु झालं असून त्या दिवशी कोरोना लसीकरणाचा विक्रम झाला असल्याचं पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणाले.

‘मन की बात’ मधून पंतप्रधानांनी मिल्का सिंग यांचं स्मरण केलं. तसेच टोकियो ऑलंपिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा संघर्ष कठोर आहे असं सांगत त्यांनी ऑलंपिकमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना पंतप्रधांनांनी शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधानानी आपल्या मन की बात या कार्यक्रमात साताऱ्याच्या प्रवीण जाधव या ऑलंपिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “जर तुम्ही आमच्या प्रवीण जाधव बद्दल ऐकले  तर तुम्हाला पण वाटेल की किती कठीण संघर्षानंतर प्रवीण इथे पोहोचले आहेत. प्रवीण जाधव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका गावात राहतात. ते तिरंदाजीतील  उत्कृष्ट खेळाडू आहेत. त्यांचे आईवडील मजुरी करून कुटुंब चालवतात आणि आता त्यांचा  मुलगा, आपल्या पहिल्या ऑलिंपिकसाठी टोकियोला जात आहे. ही  फक्त त्यांच्या आईवडिलांसाठीच नव्हे, तर आपल्या सर्वांसाठीही अभिमानाची गोष्ट  आहे.”

हे ही वाचा:

आरबीआयच्या निर्णयाने ‘अर्थतज्ज्ञ’ राजकारणी अडचणीत

जम्मू काश्मीरनंतर लडाखच्या नेत्यांसोबत केंद्राची बैठक

जम्मू विमानतळाजवळ स्फोट

कोरोना रुग्णसंख्येत दीड हजारांनी वाढ

पंतप्रधान म्हणाले की, “टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे. ह्या खेळाडूंना भारताचा गौरव  वाढवायचा आहे. म्हणूनच मी देशवासियांना सल्ला देऊ इच्छितो, की या खेळाडूंवर आपण  कळत-नकळत दबाव आणायचा नाही तर खुल्या मनाने त्यांना पाठिंबा द्यायचा आहे.”

Exit mobile version