मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान

मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशावरून उत्तर प्रदेशमधील मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आले आहेत. आता त्या उतरवलेल्या भोंग्यांबद्दल योगी सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतला आहे. उतरवलेले भोंगे शाळा किंवा रुग्णालयाला दान करण्यात येणार असल्याचे, रविवार, २२ मे रोजी मुख्यमंत्री योगी यांनी सांगितले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या साप्ताहिक मासिके ‘ऑर्गनायझर’ आणि ‘पांचजन्य’ यांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एका मीडिया सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री योगी यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, उत्तर प्रदेशमधील मशिदींमधील लाऊडस्पीकरचा एकतर आवाज कमी करण्यात आला आहे किंवा लाऊडस्पीकर काढून टाकण्यात आले आहेत. जे काढलेले लाऊडस्पीकर आहेत ते शाळा आणि रुग्णालयांना दान केले जात आहेत.

हे ही वाचा:

‘१.५, २ रुपये इंधन दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा’

१० लाख आशाताईंचा WHO कडून सन्मान

पंतप्रधान मोदी जपान दौऱ्यावर

‘१.५, २ रुपये इंधन दर कमी करणे ही सामान्य माणसाची क्रूर थट्टा’

पुढे ते म्हणाले, सरकार स्थापन झाल्यानंतर रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली, हनुमान जयंती शांततेत पार पडली. हे तेच यूपी आहे जिथे पूर्वी क्षुल्लक मुद्द्यांवरून दंगली व्हायची. आता हे सर्व बंद झाले आहे. भटक्या प्राण्यांच्या समस्येबद्दल योगी म्हणाले, आमचे सरकार आल्यावर आम्ही अवैध कत्तलखाने बंद केले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर भटक्या जनावरांचा त्रास वाढला. त्यांनतर या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही ५ हजार ६०० भटक्या प्राण्यांना आश्रयस्थान दिले आहे. तसेच राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात तीर्थक्षेत्रे विकसित केली जात असल्याची माहिती योगी यांनी दिली आहे.

Exit mobile version