डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतिपदासाठी अपात्र

अमेरिकी संसद हिंसाचाराप्रकरणी न्यायालयाचा निर्णय

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपतिपदासाठी अपात्र

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीसाठी पुन्हा एकदा निवडणूक प्रचारात गुंतलेले अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. कोलोराडो प्रांताच्या मुख्य न्यायालयाने अमेरिकेतील संसद इमारतीवर झालेल्या हिंसाचाराप्रकरणी मंगळवारी ट्रम्प यांना अमेरिकी राज्यघटनेंतर्गत राष्ट्रपतिपदासाठी अपात्र ठरवले आहे. न्यायालयाने रिपब्लिकन पक्षाकडून व्हाइट हाऊसच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार असलेल्या ट्रम्प यांना राष्ट्रपतिपदासाठी देशाच्या प्राथमिक मतदानापासून हटवण्याचा निर्णय घेतला.

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच १४व्या राज्यघटनेच्या कलम ३चा वापर राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यासाठी करण्यात आला आहे. कोलोराडा उच्च न्यायालयाने ४-३च्या बहुमताने हा निर्णय सुनावला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ज्या न्यायालयाने ट्रम्प यांच्या विरोधात निर्णय दिला आहे, त्यांचे सर्व न्यायाधीश डेमोक्रेटिक पक्षाच्या गव्हर्नरने नियुक्त केलेले आहेत.

जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांचा निर्णय बदलला

कोलोराडो प्रांताच्या उच्च न्यायालयाने जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांचा आदेश बदलून हा निर्णय दिला. ६ जानेवारी, २०२१ रोजी अमेरिकी संसदेवर हल्ला करण्यासाठी ट्रम्प यांनी जमावाला भडकवले होते, मात्र राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी त्यांना रोखले जाऊ शकत नाही, असे कनिष्ठ न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यासाठी राज्यघटनेतील कलमानुसार, राष्ट्रपतिपदाला संरक्षण दिले जाते की नाही, हे स्पष्ट नसल्याचे नमूद केले होते.

हे ही वाचा:

इंडिगोचे उड्डाण, जगातील टॉप १० मध्ये!

ज्ञानवापी मशीद प्रकरणात मुस्लिम पक्षाला दणका; याचिका फेटाळल्या

 मध्य प्रदेश विधानसभेतील नेहरुंचे चित्र काढून डॉ. आंबेडकरांचे चित्र लावले

 राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी अडवाणी, मुरली मनोहर जोशींना रितसर निमंत्रण

अर्थात उच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयाला ४ जानेवारीपर्यंत अथवा या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकी अध्यक्षपदाच्या शर्यतीत राहतील की नाही, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.

Exit mobile version