ट्रम्प यांच्यावर महाभियोग…

ट्रम्प यांच्यावर महाभियोग…

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जवळपास वर्षभरात दुसऱ्यांदा महाभियोगाचा सामना करण्याची वेळ आली आहे. अमेरिकन लोकशाहीच्या इतिहासात ही पहिलीच घटना आहे, जेव्हा जवळपास वर्षभराच्या अंतरात एकाच राष्ट्राध्यक्षावर महाभियोग दाखल व्हावा.

अमेरिकेला इ.स.१७७६ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, अमेरिकेने लोकशाहीचा अवलंब केला. त्यानंतरच्या सर्व राष्ट्राध्यक्षांत चार राष्ट्राध्यक्षांवर महाभियोग दाखल करण्यात आला होता, मात्र एकाही वेळेला तो मंजूर झाला नाही. जेम्स ब्युखॅनन (१८६०), ऍण्ड्र्यु जॉन्सन (१८६८), रिचर्ड निक्सन (१९७३), बिल क्लिंटन (१९९८), या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्प यांच्यापुर्वी महाभियोगाचा सामना केला आहे. ट्रम्प यांच्यावर २०२० आणि नुकताच २०२१ मध्येही महाभियोग दाखल केला होता. यापुर्वीच्या प्रयत्नांना यश आले नव्हते, तर सध्या हा प्रस्ताव सेनेटमध्ये प्रलंबित आहे.

सेनेटकडे प्रस्ताव जाण्यापूर्वी या प्रस्तावावर अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिव्सने मोहर उमटवली होती. या सभागृहात डेमोक्रॅट्सचे बहुमत असल्याने रिपब्लिकनपैकी एकानेही महाभियोगाच्या बाजूने मत दिलेले नसतानाही हा प्रस्ताव पारित झाला होता. त्यानंतर अमेरिकन सेनेटमध्ये मात्र दोन्ही पक्ष तुल्यबळ असल्याने येथील लढत चुरशीची असणार आहे. मात्र अमेरिकन सेनेटमध्ये निव्वळ बहुमत असूनही उपयोग नाही, तर या सभागृहात हा प्रस्ताव पारित व्हायला एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्यांची मान्यता असावी लागते. त्यामुळे महाभियोगाचा प्रस्ताव सेनेटमध्ये मंजूर होतो की नाही हे पाहणे उत्कंठावर्धक ठरेल.

ट्रम्प यांच्याबाबत असाच प्रकार साधारणपणे मागील वर्षी देखील घडला होता. तेव्हाही खालच्या सभागृहाने पारित केलेला महाभियोगाचा प्रस्ताव सेनेटमध्ये फेटाळला गेला होता.

Exit mobile version