अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प!

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेणार शपथ

अमेरिकेत पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प!

संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले असून रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष असणार आहेत हे स्पष्ट झाले आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची थेट लढत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्याशी होती. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार मुसंडी मारत कमला हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी घेतली होती. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील.

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. भारतीय वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी अमेरिकेत मतदानाला सुरुवात झाली. बुघवारी पहाटे मतमोजणीला सुरुवात होऊन दुपारी १ च्या सुमारास निकाल स्पष्ट झाले. यानुसार, रिपब्लिकन पक्षाला अमेरिकेत बहुमत मिळालं आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी होण्यासाठी ५३८ इलेक्टोरल मतांपैकी २७० मतं मिळवणं आवश्यक असते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमत मिळालं आहे.

“आता आपण आपला देश कधीच नव्हता इतका उत्तम बनवणार आहोत. हे यश आपल्या सगळ्यांना एकत्र आणणार आहे. आपल्याला सर्व समस्या सोडवायच्या आहेत. आपण सगळे मिळून अमेरिकेला पुन्हा महान बनवू शकतो. मी तुमचा अपेक्षाभंग करणार नाही. अमेरिकेचं भविष्य आणखी विशाल, आणखी चांगलं आणि आणखी सामर्थ्यशाली असेल,” असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : 

संविधान बचाव, भारत जोडोच्या माध्यमातून राहुल गांधींकडून अराजकता पसरवण्याचे काम सुरू

भाजपाकडून ४० बंडखोरांवर कारवाईचा बडगा

जम्मू- काश्मीरच्या कुपवाडामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून दाखवावा!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना विजयानंतर शुभेच्छा दिल्या आहेत. “ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचे मनापासून अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशाचा आधार घेत असताना, मी भारत- अमेरिका व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आपल्या सहकार्याचे नूतनीकरण करण्यास उत्सुक आहे. आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया,” अशा शुभेच्छा नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.

Exit mobile version