“निवडणूक असतानाच कोरोना कसा येतो?”

“निवडणूक असतानाच कोरोना कसा येतो?”

नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये ठाकरे सरकार निवडणुका घ्यायला घाबरत आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “बंगाल, केरळ, तामिळनाडूसह पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतात. मग नवी मुंबई आणि औरंगाबादमध्येच निवडणूक का होत नाही? असा सवाल करतानाच निवडणुका होत असताना कोरोना सरकारला विचारून येत असतो का?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

“नवी मुंबई, औरंगाबादच्या निवडणुका तुमच्या मर्जीनुसारच होणार आहेत का? निवडणूक असतानाच कोरोना कसा येतो? पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतही निवडणुका होत आहे. त्या आधी आपल्या राज्यातही निवडणुका झाल्या आहेत. मग नवी मुंबई आणि औरंगाबादमध्ये का होत नाही? जिथं सोयीचं आहे, तिथं निवडणुका घ्यायच्या. जिथं सोयीचं नाही तिथे निवडणुका घ्यायच्या नाहीत, अशी सरकारची भूमिका आहे.” अशी टिका फडणवीसांनी केली.

हे ही वाचा:

बंगालमध्ये रंगणार ममता विरुद्ध सुवेंदू मुकाबला?

निवडणूक पुढे ढकलून महापालिकांवर नियुक्त केलेल्या प्रशासकांची मुदत ३० एप्रिलपर्यंत वाढवण्याच्या बाबतच्या विधेयकाला आमचा विरोध आहे, असं सांगतानाच नवी मुंबई आणि औरंगाबादची निवडणूक अवघड वाटत असल्यानेच कोरोनाचं कारण पुढे करून निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकार अमर्याद अधिकार आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे. ३० एप्रिल २०२१ पर्यंत हे अधिकार सरकारने स्वत:कडे घेतले होते. ते जुलैपर्यंत घ्या. तोपर्यंत कोरोना लस देण्याचा मोठा पल्लाही गाठलेला असेल. त्यानंतर निवडणुका घ्या. असेही ते म्हणाले.

Exit mobile version