… की महानगरपालिकेला आणखीन बळी हवे आहेत?

… की महानगरपालिकेला आणखीन बळी हवे आहेत?

मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका तीन मजली चाळीचा काही भाग कोसळला. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली. न्यू कलेक्टर कंपाउंडमधील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत १७ जण गंभीर जखमी झाले असून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना मालवणी भागातील अनधिकृत बांधकामं आणि त्याकडे असलेले प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष या बाबी दर्शवते असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे.

“मालवणीतील दुर्घटनेनंतर तरी बेहरामपड्यातील ४ मजली बेकायदेशीर इमारतींवर कारवाई करा. की महानगरपालिकेला आणखीन बळी हवे आहेत?” असा सवाल भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर मुंबई भाजपाने देखील याविषयावर ट्विट केले आहे. “झोपडीवर काँक्रीटचे तीन-चार मजले चढवलेले. गेली २० वर्षे महानगरपालिकेने मालवणीतल्या बेकायदा बांधकामांकडे खिसे भरून काणाडोळा केला. त्याला व्होटबँकेच्या राजकारणाने आश्रय दिला. बांद्रा प्लॉट, बेहराम बाग, भेंडी बाजार, बेहराम पाड्यात हेच चित्र आहे.” असं ट्विट मुंबई भाजपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून करण्यात आलं आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी काँक्रीटच्या बहुमजली झोपड्या बघायला मिळतात. या झोपड्या अनेकवेळा अनधिकृत असतात. अनेकवेळा स्थापत्यशास्त्राचे नियम डावलून हे बांधकाम गेले जाते. त्यामुळे अतिवृष्टी झाली की या झोपड्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात. महापालिकेकडून या झोपड्यांवर कारवाई करण्याऐवजी मतांच्या राजकारणासाठी किंवा लाच घेऊन दुर्लक्ष केलं जातं, असा आरोप भाजपाकडून केला जात आहे.

हे ही वाचा :

प्रशांत किशोर-शरद पवार भेट आज सिल्वर ओकवर

अजितदादा आणि पत्रकारांची गळचेपी

४७ व्या जी-७ परिषदेत पंतप्रधान मोदी होणार सहभागी

कॅनडातून आलेल्या पार्सलमध्ये सापडला कोट्यवधींचा गांजा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेची दखल घेत मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर अपघातग्रस्तांना आर्थिक मदतही जाहीर केली आहे.

Exit mobile version