भुजबळ परवेजला राहण्याचं भाडं देतात का?

भुजबळ परवेजला राहण्याचं भाडं देतात का?

छगन भुजबळ यांनी मुंबईत नऊ मजली इमारत बांधली आहे. या इमारतीत संपूर्ण भुजबळ कुटुंब राहत आहे. मात्र, कागदावर परवेज कन्स्ट्रक्सशनची मालकी दाखवली आहे. त्यामुळे भुजबळांनी या परवेजशी आणि इमारतीशी काय संबंध आहे हे स्पष्ट करावं, या परवेजला भुजबळ राहण्याचं भाडं देतात का? की त्यांच्याकडून ही इमारत विकत घेतली आहे, याचा खुलासाही भुजबळ यांनी करावा, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

किरीट सोमय्या आज नाशिकमध्ये आले होते. त्यांनी छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यानंतर सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधताना भुजबळांवर आरोपाचा भडिमार केला. मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची ९ मजली इमारत आहे. या इमारतीत अख्खं भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय? या इमारतीचं भाडं तुम्ही भरता की ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे? इथे एक खोली कुणी कुणाला राहायला देत नाही, तिथे भुजबळांना ९ मजली इमारत कशी दिली?, ही इमारत बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे सवाल करतानाच परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून या कंपन्या चालवणारे लोक बनावट आहेत, असा सोमय्या यांनी केला. तसेच येत्या शनिवारी या इमारतीची पाहणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आर्मस्ट्राँ इन्फ्रा, आर्मस्ट्राँ एनर्जीने मालेगावमधली गिरणा शुगर मिल विकत घेतली. गिरणा शुगर मिल ही भुजबळांची दुसरी बेनामी मालमत्ता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माझं चॅलेंज आहे. त्यांनी भुजबळाच्या इमारतीचे मालक कोण? हे सांगावं, असं आव्हानच सोमय्या यांनी दिलं.

हे ही वाचा:

जॅकलिनची ईडीकडून ५ तास चौकशी

जितेंद्र आव्हाड बारावा खेळाडू

तुम्ही आराम करा, काळजी घ्या, बाकीचं आम्ही बघतो

काश्मीरही काफ़िरांपासून ‘मुक्त’ करा

छगन भुजबळ यांनी नामी आणि बेनामी मालमत्ता जाहीर करावी. गेल्या आठवड्यात त्यांची १३० कोटींची बेनामी संपत्ती आयकर विभागाने जप्त केली आहे. त्यावर भुजबळांकडून अजून उत्तर आलेलं नाही, असं सोमय्या म्हणाले.

२०१३ मध्ये आर्मस्ट्राँगची मी व्हिजिटकेली. त्यावेळी भुजबळांच्या गुंडांनी आम्हाला अडवलं. आज पुन्हा आम्ही पाहणी केली. आर्मस्ट्राँग एनर्जी, आर्मस्ट्राँग इन्फ्रा, परवेज इन्फ्रा या कंपन्यांमध्ये जो पैसा आला तो कुठून आला?, असा सवाल त्यांनी केला.

Exit mobile version