प्रशांत किशोर खरोखरच काँग्रेसमध्ये जाणार?

प्रशांत किशोर खरोखरच काँग्रेसमध्ये जाणार?

निवडणुकीचे रणनीतीतज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा असली तरी काँग्रेस पक्षाशी अनेक बैठका घेऊनही त्यातून काहीही स्पष्ट होत नसल्यामुळे किशोर हे काँग्रेसमध्ये खरोखरच दाखल होणार आहेत का याविषयी प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशांत किशोर हे यापूर्वी अनेकवेळा काँग्रेसमध्ये सामील होणार याची चर्चा होती. पण आता काँग्रेसची देशभरात झालेली अवस्था पाहता त्यांना किशोर यांना आपल्या पक्षात सामील करून घेण्याची घाई लागली आहे. निदान त्यांच्या माध्यमातून काँग्रेसला उभारी आणण्याचे सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रशांत किशोर यांना कोणत्याही परिस्थितीत पक्षात घेण्यासाठी काँग्रेस आटापीटा करत आहे. पण हे वाटते तेवढे सोपेही नाही.

प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये दाखल होण्यासाठी इच्छुक असले आणि काँग्रेसही त्यांच्यासाठी आग्रही असली तरी त्यांना जे स्वातंत्र्य काँग्रेसमध्ये हवे तेवढे देण्यास कदाचित काँग्रेस तयार होणार नाही. याचे एक कारण म्हणजे काँग्रेसमधील ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांना प्रशांत किशोर डोईजड ठरू शकतील. त्यांच्या हातातील अधिकार प्रशांत किशोर यांच्याकडे गेल्यास ते या ज्येष्ठ श्रेष्ठ काँग्रेसींना पटेल का, हा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांना विरोधही होत आहे. पक्षाच्या परंपरेपेक्षा वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळेच किशोर हे काँग्रेसची जबाबदारी घेण्यासाठी लागलीच तयार झालेले नाहीत. यामागे आणखी एक कारण आहे ते म्हणजे २०२३मध्ये तेलंगणा येथे होत असलेल्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांची कंपनी आयपीसीने काँग्रेसची प्रतिस्पर्धी असलेल्या टीआरएसशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे प्रशांत किशोर यांची नेमकी भूमिका काय असेल याविषयी शंका आहे.

हे ही वाचा:

…आणि देवेंद्र फडणवीसांनी म्हटली हनुमान चालीसा

कांडला बंदर हेरॉईन प्रकरणातील आयातदाराला अटक

नितीन गडकरींच्या हस्ते सोलापुरातील १० राष्ट्रीय महामार्गांचे लोकार्पण

लष्करी खर्चाच्या बाबतीत भारत जगातील तिसरा देश

गेल्या १५ दिवसांत प्रशांत किशोर आणि काँग्रेस यांच्यात तीनवेळा बैठक झाली. काही बातम्यांनुसार त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे पण अद्याप त्याविषयी अधिकृत वृत्त आलेले नाही. तोपर्यंत संभ्रम कायम राहणार आहे.

Exit mobile version