महाराष्ट्रात कोविडचा हाहाकार चालू आहे, मात्र या परिस्थितीतही ठाकरे सरकारकडून सातत्याने राजकारण होताना दिसत आहे. प्रत्येक बाबतीत केंद्राकडे बोट दाखवण्याचे जुने धोरण ठाकरे सरकारने इतकी गंभीर परिस्थिती ओढावली असतानाही पुढे चालवले आहे. त्यामुळेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एकदा राज्यातील रेमडेसिवीरच्या तुटवड्यासाठी केंद्र जबाबदार असल्याचे अजब विधान केले.
आज नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर औषध महाराष्ट्राला दिल्यास कारवाई करू अशी धमकी केंद्र सरकार देत असल्याचे अत्यंत बिनबुडाचे आणि अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी असे म्हटले की देशातल्या १६ निर्यातदार कंपन्यांकडे रेमडेसिवीर औषधाच्या २० लाख व्हायल उपलब्ध आहेत. आता निर्यातबंदी केल्यानंतर या कंपन्या ही सर्व औषधे भारतातच विकण्यासाठी परवानगी मागत आहेत, परंतु केंद्र सरकार त्याला परवानगी देत नाही. मात्र सरकारने त्यांच्यावर ही विक्री केवळ ७ उत्पादक कंपन्यांमार्फत केली पाहिजे अशी अट घातली आहे आणि या सात कंपन्या ही जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. यामुळे मोठीच अडचण उद्भवली आहे. या औषधाची गरज आहे आणि उपलब्धताही आहे, पटकन निर्णय घेण्याची गरज आहे. ही अडचण लवकरात लवकर सोडवली पाहिजे आणि हे औषध सर्व राज्यातील शासकीय रुग्णालयांत पोहोचवले पाहिजे.
हे ही वाचा:
अमेरिकेतील गोळीबारात चार शिखांचा मृत्यू
मुख्यमंत्री कोरोनाची लाट थोपवण्याची उपाययोजना करण्याचे सोडून वसूलीत गर्क
देवेंद्र फडणवीसांची मेयो आणि मेडीकल रुग्णालयाला भेट
भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी ट्वीटरवरून एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यात त्यांनी नवाब मलिकांनी त्यांच्या विधानाचे पुरावे द्यावेत अन्यथा मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. त्याबरोबरच भातखळकरांनी नवाब ठाकरे सरकारमधील मंत्री ऑक्सिजनचा तुटवडा, ऑक्सिजन बेडचा तुटवडा याबाबत कुठे आहेत? ते बिळात लपून बसले आहेत असे देखील म्हटले आहे.
‘महाराष्ट्राला रेमदेसीवीर पुरवली तर खबरदार’ अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिली म्हणे! नवाब मलिक नेहमी गांजा पिऊनच बोलत असतात का ? माझे त्यांना आव्हान आहे, आपले म्हणणे सिध्द करा नाही तर माफी मागून तोंड काळे करा.
असे ट्वीट देखील त्यांनी यावेळी केले आहे.
'महाराष्ट्राला रेमदेसीवीर पुरवली तर खबरदार' अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिली म्हणे!
नवाब मलिक नेहमी गांजा पिऊनच बोलत असतात का ? माझे त्यांना आव्हान आहे, आपले म्हणणे सिध्द करा नाही तर माफी मागून तोंड काळे करा. pic.twitter.com/jewbXvsubu— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 17, 2021
कोविडमुळे ठाकरे सरकारचे अपयश उघडे पडले आहे. ठाकरे सरकारच्या कारभाराची पुरती लक्तरे टांगली गेली आहेत, परंतू तरीही सगळ्याला केंद्रच जबाबदार असल्याचा आव आणून स्वतःच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारमधील विविध मंत्र्यांकडून सातत्याने केला जात आहे. लसींचा पुरवठा, ऑक्सिजन इत्यादी सगळ्यांसाठी केंद्राकडे हात पसरायचे तर दुसरीकडे केंद्र सरकारवरच बिनबुडाचे गंभीर आरोप करायचे असा अजब कारभार चालू आहे.