‘नवाब मलिकांच्या आरोपांविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ’

‘नवाब मलिकांच्या आरोपांविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ’

ज्ञानदेव वानखेडे यांनी केले वक्तव्य

समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ज्ञानदेव वानखेडे यांनी समीर वानखेडेचे जातीप्रमाणपत्र दाखविले. त्यात त्याच्या नावापुढे ज्ञानदेव वानखेडे असेच लिहिल्याचे दिसत होते. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. त्यामुळे याविरोधात आम्ही न्यायालयात दाद मागू शकतो, असे ज्ञानदेव म्हणतात.

ज्ञानदेव वानखेडे यांनी या मुलाखतीत सांगितले की, माझी सगळी कागदपत्रे मी दाखविली आहेत. त्यानंतरही नवाब मलिक हे आरोप करत आहेत. त्यांना नेमके काय हवे आहे हे कळायला मार्ग नाही.

समीरच्या जातीचा दाखला माझ्याकडे आहे. त्यात माझे नाव ज्ञानदेव असेच दाखविले आहे.

समीर यांच्याविरोधात ८ कोटीचे आरोप आहेत. पण आर्यन खानच्या वकिलांनीच सांगितले आहे की, अशा कोणत्याही देण्याघेण्याचा काही संबंध नाही. स्वतः आरोपीच म्हणतो आहे की, समीर वानखेडे यांच्याशी आपले कोणतेही संबंध नाहीत. मग हा प्रश्न कुठून उद्भवतो. माझ्या मुलाने कोणताही गैरव्यवहार केलेला नाही. आतापर्यंत त्याच्यावर असा कोणताही डाग लागलेला नाही.

 

हे ही वाचा:

हिमवर्षावात बालमित्रांनी गमावले प्राण!

‘दाऊद आपल्या देशात नसला, तरीही त्याचा प्रभाव महाविकास आघाडी सरकारवर आहे’

नुकसान भरपाईच्या शासन यादीतून पश्चिम विदर्भ गायब!

धक्कादायक! वर्गमित्राचीचं केली हत्या!

 

चुकीचा दाखला देऊन नोकरी मिळविली आहे, असा आरोप होत असल्याबद्दल ज्ञानदेव वानखेडे म्हणाले की, मी मागासवर्गीय आहे. मीही गरिबीतून पुढे आलो आहे. मग समीर मुस्लिम कसा काय होऊ शकतो? माझी जात, माझा धर्म मी स्पष्ट केला आहे, मग तो मुस्लिम कसा होऊ शकतो. जातीचा दाखला मी दाखविला आहे. आणखी काय दाखवायचे. नोकरी मिळविताना खरी डॉक्युमेंट दिलेली आहेत. सगळी कागदपत्रे खरी आहेत. मी जन्मतः मागसवर्गीय आहे मग तो मुस्लिम कसा असेल. समीर वानखेडे यांचे नवाब मलिक यांनी सादर केलेला जन्मदाखला कुठून आला, या प्रश्नावर वानखेडे म्हणाले की, हे प्रमाणपत्र कुठून आले, हे माहीत नाही. नवाब मलिक हा माणूस काहीही करू शकतो. त्यांच्या जावयाला अटक केल्यामुळे ते नाराज झाले असावेत.

Exit mobile version