29 C
Mumbai
Saturday, January 4, 2025
घरराजकारण‘नवाब मलिकांच्या जावयाला पकडल्यामुळेच ते आमच्या मागे’

‘नवाब मलिकांच्या जावयाला पकडल्यामुळेच ते आमच्या मागे’

Google News Follow

Related

मी ज्ञानदेव वानखेडेच!

एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी सोमवार, २५ ऑक्टोबर रोजी माध्यमांसमोर येत महाविकास आघडीचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर तोफ डागली आहे. ‘नवाब मलिकांच्या जावयाला पकडल्यामुळेच ते आमच्या मागे लागले आहेत.’ असा घणाघात त्यांनी केला आहे.

काय म्हणाले ज्ञानदेव वानखेडे?
मी ज्ञानदेव कचरुजी वानखेडे आहे. मी दाऊद वानखेडे नाही. हे कोणी केलं असेल? अथवा लिहिलं असेल? तर मला काही माहित नाही. पण माझ्या नावाची सगळी अधिकृत कागदपत्र माझ्याकडे आहेत. मी धर्मांतर केलेले नाही. हे सपशेल खोटे आहे. माझ्या मुलाचेही अधिकृत नाव समीर ज्ञानदेव वानखेडे हेच आहे असे सांगत त्यांनी आपल्या नावाची सरकारी कागदपत्रेही माध्यमांसमोर सादर केली आहेत. 

यावेळी त्यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना जोरदार टोला लगावला आहे. नवाब मलिकांच्या जावयाला पकडल्यामुळे ते आमच्या मागे लागले आहेत. ते काहीही करू शकतात. ते राज्यातील मंत्री आहेत. नेते आहेत. पक्षाचे प्रवक्ते आहेत. ते काहीही करू शकतात अशी प्रतिक्रिया ज्ञानदेव वानखेडे यांनी दिली आहे.

हे ही वाचा:

हा ढोंगीपणा का? सगळं ज्ञान दिवाळीलाच का आठवतं

नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत

मला चुकीच्या पद्धतीने अडकवले जात आहे, वानखेडे यांनी लिहिले पत्र

… म्हणून त्याने मारली राज्यपालांच्या कानशिलात!

मी आत्ताही माझ्या घरचे, गावचे घर दाखवू शकतो. माझ्या मुलाने असे पैसे घेतले असते तर मी श्रीमंत झालो असतो. पण माझ्या मुलाने गेल्या १५ वर्षांत पैसे घेतले नाहीत आणि पुढेही घेणार नाहीत. प्रभाकर साईल कुठून आला? कसा आला? हे नवाब मलिकांनाच विचार असे ते म्हणाले. त्याने (प्रभाकर साईलने) त्याच्या जबाबात कुठेही म्हटले नाही की समीरला पैसे दिले.

त्या प्रभाकर साईलवर पण दबाव असू शकतो. तो पाणी पीत होता, खोकत होता. त्यालाही डांबून ठेवलेला असू शकतो. नवाब मलिक श्रीमंत आहे. मंत्री आहे. ते काहीही करू शकतात. अशी प्रतिक्रिया समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी माध्यमांना दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा