23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरधर्म संस्कृतीआम्ही रामाचे शत्रू आहोत... द्रमुकचे ए. राजांनी गरळ ओकली

आम्ही रामाचे शत्रू आहोत… द्रमुकचे ए. राजांनी गरळ ओकली

भारत हा देश नसून एक उपखंड, असंही केलं वक्तव्य

Google News Follow

Related

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पूत्र आणि राज्याचे क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबतच्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांना फटकारलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने उदयनिधी यांची खरडपट्टी काढल्यानंतर आता द्रमुक पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ए. राजा यांनी भारत आणि सनातन धर्माबाबत संतापजनक वक्तव्य केलं आहे.

ए. राजा म्हणाले की, “तुम्ही म्हणत असाल की, अमूक एक तुमचा देव आहे आणि तुम्ही इतरांना ‘भारत माता की जय’ बोलायला सांगत असाल तर आम्ही तुमचा ईश्वर मानत नाही. तसेच तुमच्या भारतमातेचा आम्ही स्वीकार करत नाही. आम्ही सर्वजण रामाचे शत्रू आहोत. माझा रामायणावर आणि रामावर विश्वास नाही,” असं वक्तव्य ए. राजा यांनी केलं आहे.

“भारत कधीच एक राष्ट्र नव्हतं. एका राष्ट्राचा अर्थ होतो, एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. तेव्हा ते एक राष्ट्र असतं. परंतु, भारत एक राष्ट्र नाही. भारत एक उपखंड आहे. इथे तमिळ हे एक राष्ट्र म्हणजेच एक देश आहे. मल्याळम एक भाषा, एक राष्ट्र, एक देश आहे. उडिया एक भाषा, एक राष्ट्र आणि एक देश आहे. अशी सगळी राष्ट्रं मिळून भारत हा मोठा उपखंड तयार होतो. त्यामुळे भारत हा देश नसून एक उपखंड आहे,” असंही वादग्रस्त वक्तव्य ए. राजा यांनी केलं आहे.

ए. राजा असंही म्हणाले की, “या उपखंडात वेगवेगळ्या भाषा, परंपरा आणि संस्कृती आहेत. तुम्ही तमिळनाडूला आलात तर तिथली वेगळी संस्कृती तुम्हाला पाहायला मिळेल. केरळमधील संस्कृती वेगळी आहे. दिल्लीत वेगळी संस्कृती आहे. काश्मीरमध्ये एक वेगळी संस्कृती आहे. तुम्ही त्या संस्कृतींचा स्वीकार करा. मणिपूरमधील लोक श्वानाचं मांस खातात. तुम्ही ती गोष्टदेखील स्वीकारली पाहिजे. एखादा समाज गोमांस खात असेल तर त्यात तुम्हाला काही अडचण असण्याचं कारण नाही. त्या लोकांनी तुम्हाला गोमांस खायला सांगितलं आहे का? त्यामुळेच विविधतेत एकता असूनही आपल्यामध्ये मतभेद आहेत. परंतु, तुम्ही ते मतभेद स्वीकारले पाहिजेत.”

हे ही वाचा:

स्वतःच्या जुळ्या मुलांना पाहण्याआधी पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी धाव

डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकणार

विभागीय शालेय किकबॉक्सिंग स्पर्धेत आलोक, दुर्वाला सुवर्ण

भाजपाने चंदीगड उपमहापौरपदाची निवडणूक जिंकली

याआधी उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियासारख्या आजारांशी केली होती. तसेच त्यांनी सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. यावरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना चांगलेच फटकारले होते. “तुम्ही तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर केला आहे आणि आता तुम्ही याप्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मागताय? तुम्ही सामान्य व्यक्ती नसून एक राजकारणी आहात,” असे खडेबोल न्यायालयाने त्यांना सुनावले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा