तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. त्यामध्ये तामिळनाडूमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता असून सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून १३२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर प्रतिस्पर्धी अण्णा द्रमुक १०१ जागांवर आघाडीवर आहे. मक्कल निधी मय्यम पक्षाचे नेते कमल हसन आघाडीवर आहेत.
मक्कल निधी मय्यम या पक्षाची स्थापना काही दिवसांपूर्वीच झाली होती. त्याचे नेते कमल हसन यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून तामिळनाडू पिंजून काढला होता. सध्या ते त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर आहेत.
गेल्या वेळच्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकने बहुमत मिळवले होते. २३४ जागा असलेल्या विधानसभेत अण्णा द्रमुकने १३६ जागा मिळवल्या होत्या तर विरोधी द्रमुक पक्षाला ८९ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर काँग्रेसला ८ जागा मिळाल्या होत्या.
हे ही वाचा:
नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर
निवडणूक निकालांच्या आधीच काँग्रेसने काढला पळ
२०१६ साली झालेल्या निवडणुकीत एआयडीएमकेच्या जयललिता यांनी सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती. तामिळनाडूच्या इतिहासात ३० वर्षांत पहिल्यांदाच असा प्रकार घडला होता. त्या निवडणुकीत पीएमके आणि भाजपा हे देखील वेगळे लढले होते. आता एआयडीएमके, भाजपा आणि पीएमके एकत्र निवडणूक लढवत आहेत.