काँग्रेस म्हणजे निवडणुका जवळ आल्या की, मत मागणारा पक्ष

डीएमके नेत्याने केली चिरफाड

काँग्रेस म्हणजे निवडणुका जवळ आल्या की, मत मागणारा पक्ष

एकीकडे इंडी आघाडीतील दरी दिवसेंदिवस रुंदावत चाललेली असताना तामिळनाडूतील डीएमके पक्षाच्या मंत्र्याने काँग्रेसबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे ही दरी आणखी वाढणार आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच आम आदमी पक्षाचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखविलेला असताना आता इंडी आघाडीचा सदस्य असलेल्या डीएमकेनेही काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिली आहे.

डीएमकेचे मंत्री राजा कन्नप्पन यांनी म्हटले आहे की, काँग्रेस हा जुना आणि मोठा पक्ष असला तरी त्यांनी आपली क्षमता गमावली आहे. काँग्रेसचा विचार केला तर हा पक्ष फक्त मत मिळविण्यापुरता निवडणुका लढवतो. त्याचा काय उपयोग? आपण मेहनत घेतली पाहिजे, लोकहितार्थ काही केले पाहिजे, या भूमिकेतून हा पक्ष चालवला जात नाही. पण जेव्हा निवडणुका येतात तेव्हा हे बाहेर पडतात. ते लोकांमध्ये काम करत नाहीत.

हे ही वाचा:

सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजाचा प्रश्न सुटणार

दिल्लीच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मुलाची हत्या करून तलावात फेकले

प्रथमच नायट्रोजन गॅस देत अमेरिकेत देण्यात आला मृत्युदंड!

‘इतिहासात काय नाव लिहून जाणार, नितीश कुमार?’

डीएमके आणि काँग्रेस हे इंडी आघाडीतील सदस्य आहेत. सध्या इंडी आघाडीत लोकसभेच्या जागावाटपावरून चर्चा सुरू आहेत. पण काँग्रेसला कुणीही त्यांच्या वाट्यातल्या जागा देण्यास तयार नाही. डीएमके आणि काँग्रेसमध्ये रविवारी जागावाटपाबद्दल चर्चा होणार आहे. त्याबाबत कन्नप्पन म्हणतात की, काँग्रेस हा मोठा पक्ष आहे आणि आम्ही ते नाकारत नाही पण ते आपली क्षमता गमावत आहेत.

इंडी आघाडीतील सदस्य असलेल्या तृणमूलने बंगालमध्ये काँग्रेसला अवघ्या २ जागा दिल्या तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने  स्वबळावर  लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version