पुजाऱ्याला थोबाडीत मारणारा मुजोर जिल्हाधिकारी निलंबित

पुजाऱ्याला थोबाडीत मारणारा मुजोर जिल्हाधिकारी निलंबित

लग्न समारंभात कोव्हिडसंबंधी नियमांचं उल्लंघन केल्याने वऱ्हाडींची वरात काढणाऱ्या कलेक्टरचं निलंबन करण्यात आलं आहे. त्रिपुरातील आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी लग्नात घुसून वऱ्हाडींवर कारवाई केली होती. मात्र कारवाई दरम्यान वऱ्हाडींशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या हस्तक्षेपाने यादवांवर कारवाई करण्यात आली. आयएएस अधिकारी शैलेश यादव यांच्याविरोधात भाजपा आमदारांनीही निदर्शनं केली होती.

पश्चिम त्रिपुरातील लग्न समारंभात जाऊन आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी वधू-वरासह पाहुण्यांनाही हुसकावून लावलं होतं. या घटनेचा व्हिडीओ झाल्यानंतर काही जणांनी त्यांच्या दबंग कारवाईचं कौतुक केलं होतं, मात्र त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकाही केली. त्यामुळे शैलेश यादव यांनी माफीही मागितली होती. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. परंतु अखेर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.

एकीकडे अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण आयसीयूत दाखल आहेत, तर दुसरीकडे काही मंगल कार्यालय चालक जिल्हा प्रशासनाचे नियम धुडकावून मनमानी पद्धतीने लग्न समारंभ करत असल्याचं जिल्हाधिकारी यादव यांच्या लक्षात आलं. त्यांनी पोलिसांना कारवाई करण्यास सांगितलं. मात्र, पोलीसही टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरं देत होते. त्यामुळे या लग्न सोहळ्यांना पोलिसांचंही अभय असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांचं बेजबाबदार वर्तन पाहून संतापलेले जिल्हाधिकारी शैलेश यादव स्वतःच मैदानात उतरले.

हे ही वाचा:

रश्मी शुक्लांना सीबीआय साक्षीदार बनवणार

चेन्नईचा सुपर विजय

महाराष्ट्रात आढळले ६३,३०९ नवे कोरोना रूग्ण

मोफत लशीची फक्त घोषणा, मग १ मेपासून लस का नाही?

संतापलेल्या जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी प्रशासन आलेलं असतानाही आपल्याच धुंदीत असलेल्या वऱ्हाड्यांना थेट चोपण्याचे आदेश दिले. पोलीस यंत्रणा वरवरची कारवाई करताना पाहून त्यांनी स्वतः पुढे होऊन कारवाई करण्यास सुरवात केली. यावेळी एका लग्नात तर त्यांनी नियम मोडणाऱ्या पुजाऱ्याच्या कानशिलातही लगावली.

Exit mobile version