प्रज्वल रेवण्णा अश्लील चित्रफित प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. प्रज्वल रेवण्णा अश्लील चित्रफित प्रकरणात भाजपाने कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यावर मोठा आरोप केला आहे. भाजपा नेते आणि सध्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अटकेत असलेले जी देवराजे गौडा यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार आणि अन्य चार मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी गौडा यांनी दावा केला की, हसनचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांचे कथित व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह वितरित करण्यासाठी या व्यक्ती जबाबदार होत्या.
डी के शिवकुमार यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्यासाठी तसेच एचडी. कुमारस्वामी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची तयारी दाखवली होती, असा गौप्यस्फोट देवराजे गौडा यांनी केला आहे. देवराजे गौडाला लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आली असून सध्या ते तुरुंगात आहे. देवराजे गौडा यांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपली. त्यानंतर त्यांना जिल्हा तुरुंगात नेण्यात आलं. या दरम्यान मीडियाशी बोलताना देवराजे गौडा यांनी हा मोठा दावा केला.
हा विषय हाताळण्यासाठी चालुवरायास्वामी, कृष्णा बायरे गौडा, प्रियांक खरगे आणि एक अन्य मंत्री अशी चार जणांची टीम बनवण्यात आली होती. भाजपा, पीएम मोदी आणि कुमारस्वामी यांना बदनाम करण्यासाठी हे सर्व करण्यात आलं. १०० कोटी रुपये ऑफर करण्यात आले होते, असा दावा देवराजे गौडा यांनी केला आहे.
हे ही वाचा:
‘आप’मधील वातावरण ‘गैरवर्तन’, ‘गुंडगिरी’चे असून ‘ब्लॅकमेल संस्कृती’ने काम सुरू
“निवडून आल्यानंतर संजय दिना पाटलांचे सगळे काळे धंदे बंद करणार”
निकालाला विलंब होऊ नये म्हणून सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ब्राझीलवरून परतताना विमानात तयार केला मसुदा
आयपीएलच्या इतिहासात दुसऱ्यांदा मुंबई गुणतक्त्यात तळाला
“शिवकुमारने यांनी मला सांगितले की, तुम्ही म्हणता की पेनड्राइव्हच्या वितरणामागे कुमारस्वामी आहेत. तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, मी तुम्हाला सुरक्षित ठेवीन. हे राज्यातील कुमारस्वामींचे नेतृत्व नष्ट करण्यासाठी करण्यात आले आहे, कारण मी सहमत नाही, मला खटल्यांमध्ये फिक्स केले जात आहे. त्यांनी माझ्यावर लैंगिक छळ आणि बलात्कार प्रकरणात मला फसवण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही पुरावा सापडला नाही. आता ते मला पेन ड्राइव्ह प्रकरणात फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत,” असा आरोप त्यांनी केला आहे.