पोयसर नदी रुंदीकरणामुळे विस्थापित झालेल्या हनुमान नगर येथील झोपडीधारकांना कांदिवलीतच घर मिळावे, यासाठी भारतीय जनता पार्टीचे स्थानिक आमदार व नेते अतुल भातखळकर यांच्या प्रयत्नाना अखेर यश आले आहे. भातखळकर यांनी रहिवाशांना दिलेली वचनपूर्ती आज अखेर फळाला आली. या बाधित झोपडीधारकांना त्यांच्या हक्काचे २६९ चौ. फूटाचे घर भातखळकर यांनी बाणडोंगरी येथे मिळवून दिले. त्या सदनिकांच्या चावी वाटपाचा सोहळा आज आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते पार पाडला.
सदनिकाच्या चाव्या हातात पडल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील हास्यच सर्वकाही सांगून जात होते. पोईसर नदी रुंदीकरणात हनुमान नगरमधील ज्या बाधित झोपड्या होत्या. त्या झोपड्या रिकामी करण्याकरता मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी हे जवळ जवळ दोन-तीन वेळा हनुमान नगरमध्ये घुसून कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्यांना जोरजबरदस्ती करून झोपड्या खाली करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. या झोपडीधारकांना तत्काळ खाली करून त्यांना मानखूर्द-माहुल या ठिकाणी धाडण्याचा प्रयत्न तत्कालिन मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यानी केला होता.
या जोरजबरदस्तीला आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार विरोध केला आणि हा प्रयत्न हाणून पाडला. आमदार अतुल भातखळकर यांचं म्हणणं होतं की, विकासाला माझा कोणताही विरोध नाही, परंतु प्रकल्पबाधित ज्या झोपड्या आहेत, त्या लोकांचं स्थलांतर हे आजूबाजूच्या परिसरात व्हायला पाहिजे. ते स्थलांतर याच मतदार संघात झालं पाहिजे यासाठी ते गेले अनेक वर्ष प्रयत्न करत होते. त्यासाठी आमदार अतुल भातखळकर यांनी टोकाचा संघर्ष केला. संघर्ष केल्यानंतर आप्पा पाड्यामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४५० पीएपी सदनिका मंजूरही करून आणल्या होत्या. परंतु त्या होण्यास तीन वर्षाचा कालावधी लागणार होता.
या तीन वर्षाच्या कालावधीत मविआ सरकार आले. उद्धव ठाकरे सरकारने या ४५० पीएपी सदनिका माहुलवासियांच्या पदरात पाडल्या. त्यानंतर पुन्हा घरं तोडण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आले असताना त्यांना अतुल भातखळकर आणि नागरिकांनी विरोध करून त्यांना हुसकावून लागले. राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपाचे सरकार आल्यानंतर आता बाणडोंगरीमध्ये ५५ पीएपी आरक्षित घरं ही पोईसर नदी रुंदीकरणात जी बाधित झोपड्या आहेत त्यांना अतुल भातखळकर यांनी मिळवून दिल्यात.
या सोहळ्यात भाजपाचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले, आजचा दिवस हा अत्यंत महत्वपूर्ण दिवस होता. गेली अडीच वर्ष या विभागातील लोकांना विस्थापित व्हावं लागलं, तर इथेच त्यांना हक्काचे घर मिळाले पाहिजे असा आग्रह होता. त्यासाठी मोठा संघर्ष केला, टोकाची भूमिका घ्यावी लागली. त्याला संघर्षाला अखेर यश मिळालं आहे. कांदिवलीमध्येच हायवेला लागून या सर्व लोकांना सदनिका मिळत आहेत. लोकांकरता रस्त्यावर उतरलो. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे यश आम्हाला मिळालेले आहे. यापुढे केवळ माझ्या विभागात नव्हे, तर मुंबईतील प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या घराच्या आसपास वीस पंचवीस किलोमीटरच्या आसपास घर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आजच्या दिवशी हेही जाहीर करतो आप्पा पाड्यातील ६०० सदनिका या तयार होत आहेत, त्या आम्ही ताब्यात घेऊन आणि पोईसर आणि हनुमान नगर येथील नदीच्या रुंदीकरणामुळे जे बाधित लोकं आहेत, त्यांना आप्पापाड्यातील या सदनिकांमध्ये शंभर टक्के घर देऊ, असं आमदार अतुल भातखळकर यांनी जाहीर केलं.
हेही वाचा :
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची मांदियाळी
मुस्लीम सांगा कुणाचे? मतदारांना औरंग्याच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न…
नवा अभ्यासक्रम २०२५ सालापासूनच… MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश
एनआयएची मोठी कारवाई, ८ राज्यात ७६ ठिकाणी छापे
गेली अनेक वर्ष या हनुमान नगरमधील नाल्याशेजारी राहणाऱ्या रहिवाशांना प्रत्येक पावसामध्ये पुराचा अनुभव घ्यावा लागत असे. आठ ते दहा फुटापर्यंत पाणी घरामध्ये शिरायचे. घरे उद्धवस्त व्हायची. स्थानिक रहिवाशी अनेक वर्षापासून प्लास्टिकच्या घरात संसार थाटत होती. या सर्व समस्यांचा तोडगा अखेर अतुल भातखळकर यांनी चांगल्या प्रकारचं काम हनुमान नगरमध्ये करून दाखवला.
आमदार अतुल भातखळकर यांच्या कृपेने आम्हाला हक्काचं घर मिळालं आम्ही त्यांचे आभारी आहोत. आनंद वाटतोय हे घर मिळाल्यामुळे. पुढचा पावसाळा आमचा पाण्यात जाणार नाही. पावसात पूर येऊन पाणी शिरत होते. घरातले सर्व सामान अस्तव्यस्त व्हायचे. त्यामुळे खूप त्रास व्हायचा. त्यामुळे आजचा आनंद आम्ही आमच्या शब्दात सांगू शकत नाही, अशा प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केल्या आहेत.