राष्ट्रवादीकडून ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी दिली माहिती

राष्ट्रवादीकडून ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडून राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप रविवार, २ जुलै रोजी झाला. अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी रविवारी शपथ ग्रहण करत शिंदे – फडणवीस सरकारमध्ये प्रवेश केला. त्यानंतर या केलेल्या बंडाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या आमदारांविरोधात पावलं उचलायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका दाखल केल्याचं स्पष्ट केलं.

जयंत पाटील यांनी रात्री उशिरा पत्रकार परिषद घेत बंड केलेल्या आमदारांवर कारवाई होणार असल्याचे सांगितले. तसेच ते म्हणाले की, ९ आमदारांची कृती बेकायदेशीर असून अध्यक्ष शरद पवार यांना अंधारात ठेवून ही कृती केलेली आहे. एका सदस्याने याबद्दल तक्रार केली असून ती तक्रार स्टेट डिसिप्लिन कमिटीकडे दाखल करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अपात्रतेची याचिका विधानसभेच्या अध्यक्षांकडे दाखल केली आहे. यासंबंधी ईमेलवर तक्रार पाठवली असून फिजिकल कॉपी देखील पाठवण्यात आलं आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले की, “राहुल नार्वेकर यांच्याकडे आम्ही मागणी केली आहे की, सोमवार, ३ जुलै रोजी या पीटीशनसंदर्भात हेअरिंग घेऊन आमची बाजू ऐकून घ्यावी. निवडणूक आयोगालाही याबाबत कल्पना दिलेली आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यातील कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यांना पवार साहेबांच्या नेतृत्वाचं समर्थन केलेलं आहे. ९ आमदार ही पार्टी होऊ शकत नाही. त्यांनी केलेली कृती राज्य आणि राष्ट्रीय अध्यक्षांना न सांगता केलेली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी याबबात आम्हांला लवकरात लवकर बोलवावं, ही आमची मागणी आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

हे ही वाचा:

‘गोलमाल’मधील अभिनेते हरिश मैगन यांचे निधन

उद्धव ठाकरेंना समदुःखी मिळाला

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सत्तेत सहभागी; पुढील निवडणुका पक्ष, चिन्हासोबतच लढवणार

प्रतोद आणि विरोधी पक्षनेते पद जितेंद्र आव्हाडांकडे

जितेंद्र आव्हाड संबंधित नोटीस घेऊन पोहचले

विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड हे ती अपात्रतेची नोटीस घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरी रात्री उशिरा पोहचले.

Exit mobile version