कर्नाटकमध्ये शाळा- महाविद्यालयांमध्ये हिजाब विरुद्ध भगवा असा वाद निर्माण झाला आहे. शाळांमध्ये हिजाब घालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. काही ठिकाणी तर बजरंग दलाने विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालण्याची सक्ती केली आहे. तसेच शाळा- महाविद्यालयांमध्ये जय श्रीरामचे नारेही दिले जात आहेत. त्यानंतर आता नवा व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये एक हिजाब परिधान केलेली मुलगी कॉलेजच्या आवारात येताच भगवे शेले घेऊन असलेले काही विद्यार्थी या हिजाब घातलेल्या विद्यार्थीनीसमोर जोरदार घोषणाबाजी करतात. जय श्री रामचे नारे लगावतात. त्यावर अल्ला हू अकबर अशा घोषणा ही विद्यार्थीनी देत आहे. काही लोक हे थांबवण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहेत.
Video | जय श्री रामला विद्यार्थीनीचं अल्ला हू अकबरनं प्रत्युत्तर | Hijab Controversy | #Karnataka #Hijab #Student #Muslim #Hindu
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/EXaQRyeJh9 pic.twitter.com/Wl6VF6ABZP— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2022
जानेवारीत उडुपीच्या एका सरकारी महाविद्यालयात सहा विद्यार्थीनींना हिजाब घालून महाविद्यालयात येण्यास मज्जाव करण्यात आला होता. मात्र, महाविद्यालयाने परवानगी दिली नाही असे सांगितले गेले. त्यानंतर हा ट्रेंड निघून गेला. तसेच दुसऱ्या महाविद्यालयातही विद्यार्थीनी हिजाब घालून जाऊ लागल्या. त्याला विरोध म्हणून काही विद्यार्थीनींनी भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात जायला सुरवात केली. त्यानंतर त्याला राजकीय वळण मिळाले आणि वादाला तोंड फुटले.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
काँग्रेस नसती तर…पंतप्रधानांनी काढले काँग्रेसचे वाभाडे!
गौतम अदानी बनले आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती…
‘तुम्ही विश्वास दिला नाहीत म्हणून श्रमिकांचे स्थलांतर झाले’
कॉलेजमध्ये हिजाब आणि भगवा स्कार्फ विरुद्धचा वाद होत असताना कॉलेजच्या प्राचार्यांनी हिंदू संघटनांना भगवा स्कार्फ परिधान करण्याची मोहीम मागे घेण्याची विनंती केली आहे. मात्र, हिंदू संघटना अधिकच आक्रमक झाल्याने कर्नाटक सरकारने कर्नाटक एज्युकेशन ऍक्ट १९८३चे कलम १३३ लागू केले आहे. त्यामुळे सर्वांना सारखाच गणवेश परिधान करावा लागणार आहे.
भाजप नेते सी टी रवी यांनी प्रम्हटले आहे की, सर्व शाळेत स्कूल युनिफॉर्म अनिवार्य असावा. काँग्रेसने जाणूनबुजून विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.