महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेत आहेत. राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौरा करण्यात आहेत. त्यासाठी ते बुधवार,१८ मे रोजी सभेसाठी पुणे दौऱ्यावर गेले होते. मात्र अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने ते सभा न घेता मुंबईला रवाना झाले. त्यांनतर मनसेच्या पुणे मध्यवर्ती कार्यालयात राडा झाला आहे.
बुधवारी रात्री उशिरा पुण्यात मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात गोंधळाला सुरुवात झाली. शिवाजीनगरचे विभाग अध्यक्ष रणजित शिरोळे आणि विद्यार्थी सेनेचे शैलेश विटकर यांच्यात झटापट झाल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले असता, इतर कार्यकर्त्यांना कार्यालयात बोलवले नाही म्हणून हा वाद झाल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
दर्जेदार वृत्तसंकेस्थळ म्हणून ‘न्यूज डंका’ चा गौरव
राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या, ईडीकडून गुन्हा दाखल
पंजाब पोलिसांनी केला हेरगिरी नेटवर्कचा पर्दाफाश, दोघांना अटक
मध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही
रणजित शिरोळे हे विभाग अध्यक्ष आहेत. मात्र पक्षाच्या कोणत्याही बैठकांना का बोलावले जात नाही, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला. याचा जाब विटकर यांनी बैठकीत विचारल्यावर शिरोळे संतापले. त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. यातून कार्यकर्तेही तापले आणि राड्याला सुरुवात झाली. पुणे शहराध्यक्ष आणि मनसेच्या सर्व पदाधिकारी यांच्यासमोरच वाद झाला. या कार्यकर्त्यांच्या झटापटीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. दरम्यान, रणजित शिरोळे आणि शैलेश विटकर या दोघांनी वैयक्तिक कारणावरून झटापट झाल्याचे म्हटले आहे.