आता चारित्र्यवान कार्यकर्त्यांना संधी? बीडमध्ये राष्ट्रवादीत बदल

बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

आता चारित्र्यवान कार्यकर्त्यांना संधी? बीडमध्ये राष्ट्रवादीत बदल

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले असून राजकीय घडामोडींवरही याचे परिणाम दिसून येत आहेत. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी देशमुख कुटुंबाकडून करण्यात येत असून या प्रकरणातील सर्व आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात राजकीय नेत्यांची नावे घेतली जात आहेत. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवारांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांची संपूर्ण बीड जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याचे नाव आल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा कार्यकारणी बरखास्त केली आहे. बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

हे ही वाचा:

केजरीवालांची चमकती दिल्ली पहा, ‘पॅरिस सारखी दिल्ली’

बावनकुळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना सायकल वाटप

आरएसएस ही काँग्रेसपेक्षा खूप सहिष्णू !

खासगी प्रवासी वाहतूक : कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार

पुढील जिल्हाध्यक्ष आणि तालुका अध्यक्षांची निवड होईपर्यंत जिल्हाध्यक्ष म्हणून राजेश्वर चव्हाण हेच काम पाहतील असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कळवण्यात आलं आहे. तसेच यापुढे तालुका अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या चारित्र्याची पडताळणी करूनच नेमणुका कराव्या अशा सूचना बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, माजी आमदार संजय दौंड आणि इतर प्रमुख पदाधिकारी यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बीड जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीचा आढावा अजित पवार यांनी घेतला.

Exit mobile version