आता ‘वैश्विक हिंदुत्व उखडून’ टाकण्यासाठी हिंदूद्वेष्ट्यांचे चर्चासत्र

आता ‘वैश्विक हिंदुत्व उखडून’ टाकण्यासाठी हिंदूद्वेष्ट्यांचे चर्चासत्र

हिंदुत्वाबद्दल प्रचंड पोटदुखी असणाऱ्यांकडून सातत्याने आपली ही मळमळ बाहेर काढण्याचे उपाय सुरू असतात, पण आता हिंदुत्व वैश्विक स्तरावर केवळ रोखायचे नाही तर त्याला कसे उखडून टाकायचे यासाठी जगभरातील हिंदुद्वेष्टे एकवटले आहेत. १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत ‘डिसमॅन्टलिन्ग ग्लोबल हिंदुत्व’ नावाचा एक उपक्रम राबविला जाणार आहे. त्या माध्यमातून वैश्विक स्तरावरील हिंदुत्वाला उखडून टाकण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा ऑनलाईन केली जाणार आहे.

१० ते १२ सप्टेंबर या काळात सकाळी ९.३० ते दुपारी ३ या वेळेत हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. त्यात नॉर्थ वेस्टर्न, बर्कले, शिकागो, कोलंबिया, हार्वर्ड, पेन, प्रिन्स्टन, स्टॅनफर्ड  अशा ४० विद्यापीठांचे  प्रायोजकत्व लाभले आहे. आनंद पटवर्धन, आयेशा किडवई, बानू सुब्रमण्यम, भंवर मेघवंशी, ख्रिस्तोफ जेफरलोट, कविता कृष्णन, मीना कंदसामी, मोहम्मद जुनैद, नंदिनी सुंदर, नेहा दीक्षित, पी. शिवकामी हे हिंदुद्वेष्टे वक्ते त्यात बोलणार आहेत.यातील कविता कृष्णन आणि नंदिनी सुंदर या माओवादी संघटनांशी संबंधित आहेत तर आनंद पटवर्धन यांच्या माहितीपटाविरोधात वादळ निर्माण झाले होते.

हे ही वाचा:

व्वा! भास्कर जाधव म्हणतात, गडकरींनी उद्धव ठाकरेंशी फोनवर बोलायला हवे होते

‘पालघरकडे का होते आहे राज्य सरकारचे दुर्लक्ष?’

अंबरनाथच्या एमआयडीसीत चोरट्यांचा सुळसुळाट

पॉलिशच्या बहाण्याने चोरट्यांनी केली महिलेच्या दागिन्यांची सफाई

शुक्रवारी १० सप्टेंबरला ग्लोबल हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्वाचे राजकीय अर्थशास्त्र काय, जाती आणि हिंदुत्व, शनिवार ११ सप्टेंबरला हिंदुत्वाचे लिंगाधारित आणि लैंगिक राजकारण, राष्ट्राची रूपरेषा, हिंदुत्व विज्ञान आणि आरोग्य तसेच १२ सप्टेंबर, रविवारी हिंदुत्वाचा प्रचार आणि डिजिटल माध्यम तसेच हिंदुत्व आणि श्वेतवर्णींचे वर्चस्व अशा विषयांवर ही भाषणे होणार आहेत. या चर्चासत्राच्या चित्रावरूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाळेमुळे उखडून टाकण्याचा या आयोजकांचा विचार स्पष्ट दिसून येतो.

भारताच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी लंडनमध्ये काही भारतविरोधी गटांनी मोदींच्या राजीनाम्याची मागणी करणारे बॅनर झळकाविले होते. याच परकीय शक्ती या अशा परिसंवादांच्या मागे आहेत, अशी चर्चा आहे. शेतकरी आंदोलन, सीएएसंदर्भात झालेली आंदोलने यात परकीय शक्तींचा मोठा हात असल्याचे आणि परदेशातून या आंदोलनांना आर्थिक मदत दिली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रेटा थनबर्गसारख्या पर्यावरणाच्या नावाखाली भारतविरोधी भूमिका घेणाऱ्यांचेही खरे चेहरेही उघड झाले आहेत.  आता हा भारतविरोधातील नवा प्रयोग समोर येतो आहे.

Exit mobile version