भारत जर्मनीत हे बंध होणार दृढ

भारत जर्मनीत हे बंध होणार दृढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर गेले आहेत. सोमवार, २ मे रोजी नरेंद्र मोदी हे जर्मनीत दाखल झाले. यावेळी त्यांनी जर्मनीचे चान्सेलर ओलाफ शोल्झ यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यापाठोपाठ शिष्टमंडळस्तरीय चर्चाही झाली. भारतीय शिष्टमंडळात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचाही समावेश होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीत दाखल होताच अध्यक्षीय प्रासादात ओलाफ शोल्झ यांनी मोदींचे स्वागत केले. त्यानंतर भारत व जर्मनीमधील व्यापार आणि सांस्कृतिक बंध दृढ करण्यासंबंधित या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

‘भारत आणि जर्मनी यांच्यातील सहकार्य वाढत आहे. पंतप्रधान मोदी आणि चॅन्सेलर शोल्झ यांची बर्लिनमध्ये भेट,’ असे ट्वीट पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

लोकमान्य टिळकांवरच्या आक्षेपांना टिळकांच्या वंशजांचे सडेतोड उत्तर

राणा दाम्पत्यांच्या जामिनाची सुनावणी दोन दिवसांनी

धक्कादायक! मुंबई विद्यापीठाच्या लॉ अभ्यासक्रमाचा पेपर केला ‘सोप्पा’

वीजसंकटावर गृहमंत्री अमित शहा उचलणार पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०२२ मधील हा पहिलाच परदेश दौरा असून जर्मनीनंतर ते डेन्मार्क आणि फ्रान्सलाही जाणार आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Exit mobile version