27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणराष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त

राष्ट्रवादीचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त

Google News Follow

Related

महाराष्ट्रात रोज राजकीय अनेक घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय का घेण्यात आला आहे, याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग तसेच सेल बरखास्त करण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी प्रफुल्ल पटेल यांनी ट्विटवर सुद्धा ही माहिती दिली आहे. पत्रामध्ये प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीने राष्ट्रवादीचे सगळे विभाग आणि सेल बरखास्त केल्याची माहिती दिली आहे. त्यात कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर प्रफुल्ल पटेल यांची सही असलेल्या पत्रात पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संमतीनेच हा निर्णय घेतल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय प्रफुल्ल पटेल यांनी ट्विट करत हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान त्याचा महाराष्ट्र किंवा इतर कुठल्याही राज्यातील पक्ष संघटनेशी संबंध नसल्याचंही पटेल यांनी स्पष्ट केले आहे.
विविध निवडणुकीच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

आता ६० देशात विनाअडचण प्रवास करा!

द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी वीस हजार लाडू तयार

महाराष्ट्रातील आमदारांच्या पात्रतेबाबत १ ऑगस्टला सुनावणी

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती

दरम्यान, राष्ट्रवादीच्या या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. साडेतीन जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला अख्खा अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरखास्त केला असता तरी चाललं असतं, अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा