महाविकास आघाडीचे मन में है अविश्वास, पुरा है अविश्वास!

महाविकास आघाडीचे मन में है अविश्वास, पुरा है अविश्वास!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाायाखालची जमीन सरकली आहे. त्यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीत विसंवाद असून मविआ सरकारमध्ये अविश्वासाचं वातावरण असल्याचं स्पष्ट होतं, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला आहे. आघाडी तोडायला कोणीही गेलं नाही. तेच एकमेकांवर आरोप करत आहेत. दुसरीकडे एकत्र असल्याचा कांगावाही करत आहेत. संपूर्ण कोव्हिडच्या काळात या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काय निर्णय घेतला? केंद्राने यांना मदत केली. यांना आपापसातल्या भांडणातून फुरसत मिळत नाही. त्यांच्यात वाद आहेत. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात सतत काऊंटर करत आहेत, असं दरेकर म्हणाले.

सर्व सामान्यांसाठी रेल्वे सुरू करायला हव्यात. रेल्वे सुरू नाहीत, त्यामुळे प्रवास करायचा म्हटलं तर सातशे रुपये खर्च होतो. डोंबिवलीकरही हैराण आहेत. ज्यांचं लसीकरण झालंय त्यांना तरी रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसं पत्रंही त्यांना दिलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

‘या’ नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्या

एलआयसीचा आयपीओ डिसेंबर महिन्यापर्यंत?

कोरोना पाठोपाठ देशात झिकाचा अलर्ट

… तर शनिवारी-रविवारीही दुकानं उघडी ठेवणार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत लागू झालेले निर्बंध अद्याप कायम आहेत. कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येऊनही हे निर्बंध शिथील करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता हे निर्बंध कधी उठणार, असा सवाल मुंबईकर विचारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या १५ तारखेला यासंदर्भात बैठक होणार आहे. तेव्हा मुंबईकरांना निर्बंधामधून सूट देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

Exit mobile version