उद्धव ठाकरे म्हणजे धरण नाही

खेकड्यांनी धरण फोडले म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंवर केसरकरांचा निशाणा

उद्धव ठाकरे म्हणजे धरण नाही

उद्धव ठाकरे म्हणजे धरण नाही. धरण अभेद्य असतं, असा सणसणीत टोला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी उठाव करणाऱ्या शिंदे गटावर टीका केली. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यावर खेकड्यांनी धरण फोडलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गेल्यावर्षी मुसळधार पावसात माझ्या नेतृत्वाखालील सरकार वाहून गेलं नाही. खेकड्यांनी धरण फोडलं. ते धरणातच बसले होते. खेकडा हा खेकडाच असतो. त्याला कितीही सरळ चालवण्याचा प्रयत्न केला तरी तो तिरकाच चालतो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. त्यावर दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.

“उद्धव ठाकरे म्हणजे धरण नाही. धरण अभेद्य असतं, मातीची धरणं खेकडे पोखरु शकतात. भरभक्कम धरण म्हणजे बाळासाहेबांचे विचार हे भरभक्कम धरणासारखे आहेत. ते कधीही तुटू शकत नाहीत,” अशी दीपक केसरकर यांनी टीका केली. “उद्धव ठाकरेंकडून त्यांनी संयमाने बोलावं अशी अपेक्षा असते. त्यांनी जर संजय राऊतांसारखी भाषा वापरली, तर त्यांना ते शोभत नाही. आम्हीही त्यांच्याविषयी आदराने बोलतो, त्यांनी सुद्धा आदराने बोलावं” असं दीपक केसरकर म्हणाले.

हे ही वाचा :

अबब!! ऍप्पलचे बूट तेही ४० लाखांचे!

मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान, मुख्यमंत्री, निवडणूक आयोगावर टोमणा अस्त्राचा वापर

‘ओपेनहायमर’मधील भगवद्गीता वादानंतर ‘श्रीकृष्ण’ दिग्दर्शकाच्या पाठिशी

“बाळासाहेबांनी कायम देशाला मार्गदर्शन केलं. आपण त्या मार्गापासून वेगळे झालात. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पंतप्रधान बनण्याची इच्छा असू शकते. हा त्यांचा विषय आहे, मला त्यावर बोलायचं नाही. वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक एकत्र येऊन लढा उभारू शकत नाहीत. लढा देशहितासाठी असतो. आज देशाचं हित पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये आहे” असं केसरकर म्हणाले.

Exit mobile version