24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणत्याच्यासाठी तरी राहुल गांधी 'पंतप्रधान' होतील?

त्याच्यासाठी तरी राहुल गांधी ‘पंतप्रधान’ होतील?

हरीयाणाचे दिनेश शर्मा हे राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक आहेत.

Google News Follow

Related

खूपदा आपण पाहतो अनेकजण अनवाणी व्रत करतात. नवरात्रीमध्ये आपल्याला हे सर्रास पाहायला मिळत. आपण याबद्दल अनेक कथाही ऐकलेल्यात. देवाची उपासना करताना किंवा अनेकदा श्रद्धेपोटी अनवाणी राहायचं यासाठी देवाला गाऱ्हाणंसुद्धा लोकांनी घातलेलं आपण पाहिलंय. पण एखाद्या नेत्याचा कट्टर समर्थक जो नेत्यासाठी किंवा त्याची इच्छा पूर्ण होण्यासाठी काही दिवस किंवा काही महिने नाही तर तब्बल बारा वर्ष अनवाणी फिरतोय आणि पुढे या समर्थकाला आणखी किती वर्ष अनवाणी फिरावं लागणार याच उत्तर मिळणं कठीणच आहे.

हरीयाणाचे दिनेश शर्मा हे राहुल गांधी यांचे कट्टर समर्थक. त्यांनी बारा वर्षांपूर्वी खास राहुल गांधी यांच्यासाठी एक शपथ घेतलीय ज्यामुळे ते मागील बारावर्षापासून अनवाणी चालत आहेत. जोपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत तोपर्यंत आपण अनवाणीच राहणार असा या दिनेश शर्मा यांनी निर्धार केलाय. राहुल गांधी जिथे जिथे प्रवासासाठी जातात, तिथे शर्मा अनवाणी जातात. सध्या सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेतसुद्धा त्यांचा सहभाग आहे. डोक्‍यावर केशरी रंगाचा फेटा, अंगात पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि या कुर्त्यावर राहुल गांधी यांचा मोठा फोटो आणि हिरवा पायजमा अशा वेशात ते तिरंगा उंचावत चालतात, त्यांच्या या वेषाने नागरिकांचं ते लक्ष वेधून घेत असतातच. पण त्यांच्या अनवाणी पायाने चालण्याचा त्यांचा निर्धार आणि त्या निर्धाराचं कारण हे त्यापेक्षा जास्त लोकांचं लक्ष वेधून घेते. शर्मा यांचा असा विश्वास आहे की, अजून दोन वर्षांनी त्यांना चपला घालता येतील म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हे निश्चितपणे पंतप्रधान होतील असा विश्वास या कट्टर समर्थकाचा आहे. पण राहुल गांधी या समर्थकाला आणखी किती वर्ष अनवाणी चालवणार? असा सवाल आता उपस्थित होतोय.

लोकसभा निवडणुकीला दोन वर्ष आहेतच पण त्याआधी अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूक पार पडल्यात ज्यात काँग्रेसाचा दारुण पराभव झालेल्या पाहायला मिळाला. नुकतंच ६ नोव्हेंबरला देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, ओडिसा आणि तेलंगणा राज्यांमध्ये सात जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सात पैकी चार जागांवर भाजपचा विजय झाला. काँग्रेसला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही. नुकतंच आता हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या ६८ जागांसाठी मतदान पार पडलं. या निवडणुकीचा निकाल जरी बाकी असला तरी जनतेच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. हिमाचलच्या एका ८० वर्षाच्या आजीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात ती ठामपणे मी फक्त मोदीजींना मतदान करायला आलीय असं सांगत होती. मोदीजींनी आम्हाला सर्व काही दिलं असं तिने सर्वाना ठणकावून सांगितलं होत. पुढे आता गुजरातची विधानसभा निवडणूक लागलीय. या निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपा आणि गुजरातमध्ये उतरू पाहत असलेला आम आदमी पक्ष प्रचार करत आहेत.

पण काँग्रेसने आठवड्यापूर्वी त्यांची प्रचारमोहीम जाहीर केली. येत्या १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात गुजरातमध्ये मतदान होणाराय. यासाठी खुद्द नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यावर आहेत. इथे सुद्धा अनेक लोकांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात ज्यात भाजपाच पुन्हा विजयी होणार असा लोक विश्वास व्यक्त करत आहेत. मागेच वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांची विधानसभा निवडणूक झाली होती. यामध्ये पंजाब वगळता उर्वरित चार राज्यांत भाजपने विजय मिळवला होता आणि पंजाबमध्ये आप ने विजय मिळवला होता. तेव्हाही काँग्रेसचा मोठा पराभव झालेला. या सगळ्या घटना पहिल्या तर मग दिनेश शर्मा चपला किंवा जोडे कधी घालणार?

आता भारत जोडो यात्रा सुरु आहे. महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेकडे कोणाचं फारसं लक्ष दिसत नव्हतं त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला कधी याकडेही लोकांचं लक्ष नव्हतं. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. यावरून राजकीय वातावरणही तापले. महाराष्ट्रातील जनतेलाही राहुल गांधीच्या व्यक्त्यव्याचा राग आला. वीर सावरकर हे महाराष्ट्रातील जनतेचे आदर्श आहेत. त्याच सावरकरांवर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये राहुल गांधी यांनी टीका केली. महाराष्ट्र त्यांच्या या सावरकरांबद्दलच्या आक्रस्ताळी भूमिकेमुळे दुखावला. अगदी संजय राऊत यांनीही आपल्या पक्षाच्या वतीने नाराजी दाखवली.

हे ही वाचा:

बेंगळुरूतील स्फोटाचा मास्टरमाइंड शरीक ISIS शी संबंधित

श्रद्धाच शीर मैदान गढीतील तलावात, आरोपीची कबुली

नवले पुलावर झालेल्या अपघाताचं कारण आलं समोर

‘शिवाजी महाराजांनी माफी मागितली होती, असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदींनी केलेलेच नाही’

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांचा जॉर्ज पोनय्या यांच्यासोबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. जॉर्ज पोनय्या यांच्यावर भारत मातेचा अपमान केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर हिंदू धर्म आणि देवी-देवतांचा अपमान केल्याचा आरोपही आहे. त्यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती. या जॉर्ज यांना राहुल गांधी भेटले. मग राहुल गांधी यांनी पदयात्रा केली किंवा आणखी काय जनेतची मन जिंकणार कसे? आणि त्यांचे कट्टर समर्थक दिनेश शर्मा म्हणतात, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी पंतप्रधान बनतील आणि त्यांचा अनवाणी चालण्याचा निर्धार पूर्ण होईल. या सगळ्यावरून तरी दिनेश शर्मा यांना चपला किंवा जोडे घालायला मिळतील असे वाटत नाही. तेव्हा राहुल गांधी यांनाच आता शर्मा यांच्यासाठी जोडे घाला आंदोलन करावे लागेल की काय?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा