श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने

श्रीलंकेमध्ये सध्या गंभीर आर्थिक संकट सुरू असून राजकीय घडामोडीही सुरू आहेत. नुकतीच रानील विक्रमसिंघे यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर ज्येष्ठ नेते आणि राजपक्षे कुटुंबियांचे निकटवर्तीय दिनेश गुणवर्धने यांची शुक्रवार, २२ जुलै रोजी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच पंतप्रधानांसह मंत्रिमंडळातील १८ सदस्यांचा शपथविधीही काल झाला.

गोताबया राजपक्षे यांना जनतेच्या असंतोषाच्या उद्रेकामुळे राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांची बुधवारी संसद सदस्यांनी अध्यक्षपदी निवड केली. ७३ वर्षीय विक्रमसिंघे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधानपद रिक्त झाले होते. त्यानंतर दिनेश गुणवर्धने यांची पंतप्रधान पदी निवड करण्यातवाकी. पंतप्रधान दिनेश गुणवर्धनेंशिवाय मंत्रिमंडळात इतर १७ मंत्री आहेत. पूर्वी अर्थमंत्री असलेल्या अली साबरी यांना परराष्ट्र खात्याचे मंत्रिपद देण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मस्तीत मित्राला दिला धक्का आणि…

उमेश कोल्हे हत्येप्रकरणी आरोपींना न्यायालयीन कोठडी

गद्दार कोण? राहुल शेवाळे यांनी दिले उत्तर

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर

गुणवर्धनेंचा महाजन एकसाथ पेरामुना (एमईपी) पक्ष १९५६ मध्ये तत्कालीन सत्ताधारी आघाडीत सर्वप्रथम सहभागी झाला होता. गुणवर्धने यांनी १९८३ मध्ये कोलंबोच्या उपनगरातील महारागामा येथून विजय मिळवून संसदेत प्रवेश केला आणि त्यांनी १९९४ पर्यंत प्रमुख विरोधी नेता म्हणून काम केले. गुणवर्धने २००० मध्ये पहिल्यांदा मंत्रिमंडळात सहभागी झाले. ते २०१५ पर्यंत मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. माजी राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या कार्यकाळात एप्रिलमध्ये ७३ वर्षीय दिनेश गुणवर्धने यांना गृहमंत्रिपद देण्यात आले होते. त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे.

Exit mobile version