फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही

फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून नाही

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसच्या संदर्भात माहिती दिली. फडणवीस यांना पाठवण्यात आलेली नोटीस ही आरोपी म्हणून पाठवली नसल्याचे पाटील यांनी सांगितले. तर ही कारवाई कोणत्याही सूडाच्या भावनेने केली नसल्याचे सांगितले.

विधिमंडळात बोलताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. फोन टॅपिंग प्रकरणात जो गुन्हा नोंदवण्यात आला तो समितीच्या अहवालानंतर नोंदवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. सीआरपीची १६० कलमाच्या अंतर्गत जेव्हा नोटीस पाठवली जाते तेव्हा त्याचा अर्थ फक्त तुम्ही तुमचा जबाब द्या एवढाच असतो. तो घरी द्यायचा की पोलीस स्टेशनला जाऊन हे ठरवायचे असते. तसे ते ठरवून घरी जाऊन जबाब घेतला. त्या आधी फडणवीसांना अनेकदा प्रश्नावली पाठवली होती. पण त्यांनी त्याची उत्तरे दिली नाहीत असेही त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

कॅनडामध्ये अपघातात पाच विद्यार्थ्यांना मृत्यू  

त्या तरुणीची पूजा चव्हाण होऊ देऊ नका! चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

जागतिक बाजारात भारतातल्या स्टीलला मोठी मागणी

दहशतवादाशी संबंधित ८१ जणांना सौदी अरेबियात फाशी

विषय हा आहे की डेटा बाहेर कसा गेला. विरोधी पक्षनेत्यांनी तो पेनड्राइव्ह केंद्रीय गृहसचिवांना दिला. तपस यंत्रणांनी तो पेनड्राइव्ह द्यावा अशी विनंती केली. फडणवीसांना पाठवलेली नोटीस ही आरोपी म्हणून पाठवलेली नाही. तो फक्त जबाब नोंदवण्यासाठी पाठवली. त्यामुळे यात कोणत्याही सूडाच्या भावनेने कारवाई केली असे म्हणणे योग्य नाही असे वळसे पाटील म्हणाले.

पण या उत्तरानंतर फडणवीस यांनी बोलताना आपल्याला चौकशी दरम्यान विचारलेले प्रश्न आणि आधी पाठवलेली प्रश्नावली वेगळी असल्याचे म्हटले आहे. जबाब नोंदवण्याच्या वेळी मला जे प्रश्न विचारण्यात आले ते आरोपी करता असलेले प्रश्न होते. तुम्ही ‘ऑफिसर्स सिक्रेट ऍक्टचा भंग केला आहे असे तुम्हाला वाटत नाही का?’ अशा स्वरूपाचे प्रश्न मला विचारण्यात आल्याचे फडणवीसांनी सांगितले.

Exit mobile version