31 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरराजकारणपवारांना एकहाती सत्ता आणता आली नाही असं वळसे पाटील का म्हणाले?

पवारांना एकहाती सत्ता आणता आली नाही असं वळसे पाटील का म्हणाले?

दिलीप वळसे पाटलांनी दिले स्पष्टीकरण

Google News Follow

Related

राष्ट्रवादीचे नेते आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत वक्तव्य केले होते की, “शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत असं आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा देशात एकही नेता नसल्याचं आपण म्हणतो. पण त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही.” त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका झाली त्यावर वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

“मी खंत व्यक्त करत होतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला,” असं दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. माझे संपूर्ण भाषण ऐकलं तर मी शरद पवार यांच्याबद्दल असं काही बोललो नाही. शरद पवार यांनी ४० ते ५० वर्ष आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काम केले आहे. देशात अनेक प्रादेशिक पक्ष आहेत. त्यातील अनेक प्रादेशिक पक्ष आपल्या हिंमतीवर बहुमत मिळवून सत्तेवर बसतात. परंतु महाराष्ट्रातील जनतेने अशी शक्ती शरद पवार यांच्या सोबत उभी केली नाही, याची मला खंत आहे आणि ती खंत मी व्यक्त करत होतो, असं स्पष्टीकरण दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे. शरद पवार यांना कमी लेखण्याचा किंवा त्यांना चुकीचे काही बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असंही दिलीप वळसे पाटील म्हणाले.

हे ही वाचा:

भारत दौऱ्यावर आलेल्या जर्मन मंत्र्यांनी चक्क ‘यूपीआय’द्वारे केली भाजी खरेदी

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार प्रदान !

संजय राऊत म्हणतात पक्षाने आदेश दिला तर तुरुंगातही जातो, तर निवडणूकही लढू

तिकीट विक्री, वाढलेले हॉटेलचे दर, विमानांचे भाडे यावरून चाहते नाराज !

प्रकरण काय?

शरद पवार यांच्या उंचीचा नेता देशात नाही असं आपण म्हणतो. पण दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्या एकट्याच्या बळावर महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही राष्ट्रवादीला पूर्ण बहुमत दिलं नाही. शरद पवार पूर्ण बहुमतावर एकदाही मुख्यमंत्री झाले नाहीत. ममता बॅनर्जी स्वबळावर मुख्यमंत्री झाल्या, मायावतीही झाल्या होत्या. मात्र, राष्ट्रवादीने ठराविक संख्येच्या पुढे मजल मारलेली नाही. पक्षाचे ६० ते ७० आमदार निवडून येतात कुणाशीही तरी आघाडी करावी लागते. असं वक्तव्य दिलीप वळसे पाटील यांनी केलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा