गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाने पुन्हा गाठले!

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाने पुन्हा गाठले!

महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः पाटील यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. याआधी, त्यांनी कोरोनाची लागण झालेली होती. आता त्यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे.

२४ तासामध्ये देशभरात १६ हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ७३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री यांनी ट्विट करून, ‘सौम्य लक्षणे दिसल्यानंतर माझी कोरोना चाचणी झाली आणि माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती स्थिर आहे आणि मी माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहे. माझ्या नागपूर आणि अमरावती भेटीदरम्यान संपर्कात आलेल्या सर्व लोकांना मी चाचणी घेण्याचे आवाहन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाने त्रस्त झालेल्या महाराष्ट्राची स्थिती आता सुधारत आहे. येथे साप्ताहिक संसर्ग दर देखील १.४५ टक्क्यांवर आला आहे परंतु अजूनही सिंधुदुर्ग, पुणे, पालघर, सांगली, सोलापूर, नाशिक, सातारा आणि अहमदनगर असे काही जिल्हे आहेत जिथे कोरोना संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

 

हे ही वाचा:

आजारी सचिन वाझे चांदीवाल आयोगापुढे गैरहजर

भारत-आसियान शिखर परिषदेला आज मोदी संबोधणार

सचिन पाटील नावाने वावरत होता किरण गोसावी

घोटाळे लपविण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवारांची ही ‘ट्रिक’

 

देशामध्ये केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या १,६०,९८९ आहे. गेल्या २४ तासात १२,९०,९०० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ६०,४४, ९८, ४०५ चाचण्या झाल्या आहेत.

महाराष्ट्रात सध्या १९ हजार ४८० कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख ४० हजार ९८ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

Exit mobile version