33 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरराजकारणदिग्विजय म्हणतात, सर्जिकट स्ट्राइकचे पुरावे द्या तर काँग्रेसकडून लष्करी कारवायांचे समर्थन

दिग्विजय म्हणतात, सर्जिकट स्ट्राइकचे पुरावे द्या तर काँग्रेसकडून लष्करी कारवायांचे समर्थन

काँग्रेसने दिग्विजय यांच्या वक्तव्याशी फारकत घेतली

Google News Follow

Related

काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग नेहमीच वादग्रस्त आणि बेलगाम वक्तव्य करण्यासाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा ते अशा वादात सापडले आहेत. जम्मू काश्मीरमधील पदयात्रेदरम्यान त्यांनी भारताने पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे नाहीत, असे विधान केले होते. त्यावर काँग्रेसकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसने दिग्विजय यांच्या या विधानापासून दूर राहणेच पसंत केले आहे.

दिग्विजय यांनी म्हटले होते की, ते (भाजपा) सर्जिकल स्ट्राइकविषयी बोलतात. या स्ट्राइकमुळे अनेक लोकांना मारण्यात आल्याचा दावा करतात पण त्याचे पुरावे देत नाहीत. ते खोटे बोलत आहेत. त्यानंतर पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी आपल्या या विधानावर ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे काँग्रेसचे नेते जयराम रमेश मात्र अडचणीत सापडले. त्यांनी त्या पत्रकाराला दूर जाण्यास सांगितले. विषयाला वेगळे वळण देऊ नका, असे जयराम रमेश म्हणाले.

हे ही वाचा:

टाटा एआयजीच्या व्यासपीठावर कारुळकर प्रतिष्ठानचे सांकेतिक भाषा सत्र

कुस्ती अध्यक्ष बृजभूषण प्रकरणाच्या चौकशी समितीची अध्यक्ष मेरी कोम

ठाकरेंची शिवसेना पहिल्या क्रमांकापासून ‘वंचित’

‘जन गण मन’ : राष्ट्रगीत एक अभिमान गीत

भारतीय जनता पार्टीने हा विषय उचलून धरला आणि राष्ट्रीय सुरक्षेबद्दल शंका घेतली जात असल्याचा आरोप केला. तिकडे काँग्रेसने मात्र बचावाचा पवित्रा घेतला. काँग्रेसचे सचिव जयराम रमेश म्हणाले की, यूपीए सरकारच्या काळात म्हणजे २०१४पूर्वीही सर्जिकट स्ट्राइक झाले आणि आम्ही त्यांचे समर्थन करतो. राष्ट्रहितासाठी ज्या लष्करी कारवाया केल्या गेल्या त्यांचे आम्ही समर्थन करतो, असे रमेश म्हणाले.

दिग्विजय सिंह यांनी मात्र आपले मत कायम ठेवले. त्यांनी ट्विट करत म्हटले की, पुलवामामध्ये अतिरेक्यांकडे ३०० किलो आरडीएक्स कुठून आले? अतिरेक्यांसोबत डीएसपी दविंदरला अटक करण्यात आली होती, नंतर त्याची सुटका का करण्यात आली? भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांमध्ये असलेल्या मैत्रीविषयी आपल्याला जाणून घेण्याची इच्छा आहे.

सध्या राहुल गांधी यांची पदयात्रा जम्मू काश्मीरमध्ये सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा