पश्चिम बंगालमध्ये कोण निवडणूक जिंकणार? तिथलं पक्षीय बलाबल कसं राहिल? भाजपा खरोखरच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करेल का? आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भाजपाला तोंड देण्यात यशस्वी होतील का? या प्रश्नांची उत्तरं टीव्ही९ च्या ओपिनियन पोल मधून मिळणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस बहुमताच्याजवळ राहील, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. भाजपा जोरदार मुसंडी मारणार असल्याचं दिसत असून गेल्यावेळी ३ जागा मिळवणारी भाजपा १२२ जागा मिळवेल, असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. तृणमूल काँग्रेसला १४६ जागा मिळतील, तर काँग्रेस डाव्या पक्षांच्या आघाडीला २३ जागांवर समाधान मानावं लागेल, असं दिसत आहे.
भाजपाला मिळालेली मतं ही गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा (२०१६) कैक पटींनी जास्त आहेत. भाजपाला गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २७% जास्त मतं मिळताना दिसत आहेत. तर ११९ जास्त जागा मिळताना दिसत आहेत. या निवडणुकीतमध्ये भाजपा तृणमूल काँग्रेसपेक्षा केवळ १.५% मतांनी मागे आहे, असे हा सर्वे सांगतो.
हे ही वाचा:
आंतरराष्ट्रीय उड्डाणांना एप्रिल पर्यंत स्थगिती
२०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाला १२२ जागांवर आघाडी होती. या निवडणुकीत भाजपाला ४०.७% मतं होती. जी या सर्वेनुसार ३७% असतील. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला ३९% मतं या सर्वेनुसार मिळणार आहेत.