महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (११ मार्च) कोविड-१९ विरोधातील लस घेतली. ही लस घेण्यासाठी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. परंतु मुख्यमंत्र्यांनीच त्यांच्या एका फेसबूक लाईव्हमधून लशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
आफ्रिकेतून परत पाठवलेली लस??? pic.twitter.com/QNeKz4AdV4
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 11, 2021
उद्धव ठाकरे यांनी २१ फेब्रुवारी रोजी एका फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला संबोधित केलं. तेंव्हा त्यांनी भारतीय लशींवर शंका उपस्थित केली होती. भारतीय माध्यमांमधून दक्षिण आफ्रिकेने सिरम इन्स्टीट्युटच्या लसी परत पाठवल्याची बातमी असताना या बाबतचा फोलपणा समोर आला होता. आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी स्वतःचा भारताच्या लसी परत पाठवत नसल्याचे सांगितले होते. दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री डॉ. झ्वेली मखिझे यांनी सांगितले की, मी स्पष्ट करू इच्छितो की आम्ही भारताच्या लसी परत पाठवलेल्या नाहीत. आम्ही ऍस्ट्राझेनेका लसी भारताला परत केलेल्या नाहीत.
हे ही वाचा:
https://www.newsdanka.com/politics/maharashtra-cm-is-a-liar-atul-bhatkhalkar/6209/
याबाबत आणखी खुलासा करताना ते हे देखील म्हणाले होते, की या लसींची अंतिम मुदतीची दिनांक उलटून गेलेली नाही. आमच्या गुणवत्ता चाचणी नंतरच ३१ एप्रिल ही दिनांक निश्चित करण्यात आली होती. या लसींची अंतिम मुदत उलटून गेली असल्याची चुकीची बातमी पसरवली गेली होती.