28 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरराजकारण'दिल्लीची शिक्षण व्यवस्था पोकळ आणि नौटंकी'

‘दिल्लीची शिक्षण व्यवस्था पोकळ आणि नौटंकी’

Google News Follow

Related

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री आणि राज्याचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर निशाणा साधला आहे. आप सरकारवर निशाणा साधत त्यांनी दिल्लीची शिक्षण व्यवस्था पोकळ आणि नौटंकी असल्यचे म्हटलं आहे. तसेच प्रधान यांनी दिल्लीतील खरी शाळेंची स्थिती दाखवण्याची विनंती केली आहे.

२६ ऑगस्ट २०२२ रोजी न्यूयॉर्क टाईम्स इन बिझनेस टुडेज इंडिया@100 समिटमध्ये दिल्लीच्या शाळांची बातमी प्रकाशित झाली तेव्हा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. न्यूयॉर्क टाइम्समध्ये दिल्ली सरकारच्या शैक्षणिक मॉडेलवर सविस्तर चर्चा करण्यात आली होती, ज्यामध्ये मनीष सिसोदिया यांचाळकरी मुलांसोबतचा फोटोही छापण्यात आला होता. मात्र, हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सीबीआयने २०२१-२२ च्या उत्पादन शुल्क धोरणासंदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या घरासह ३१ ठिकाणी छापे टाकले होते.

धर्मेंद्र प्रधान आप सरकारच्या अंतर्गत दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलबद्दल बोलताना म्हणाले, ‘दिल्लीमध्ये तीन प्रकारच्या शाळा आहेत सरकारी शाळा, भारत सरकारच्या शाळा आणि खाजगी शाळा. या शाळांचे दहावी आणि बारावीचे निकाल गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत घसरले आहेत. दिल्लीची शिक्षण व्यवस्था पोकळ आणि नोटांकी आहे.

हे ही वाचा:

न्यायमूर्ती उदय लळित यांनी घेतली नव्या सरन्यायाधीशपदाची शपथ

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

जगात भारी पंतप्रधान मोदी!

मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण

पुढे धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, आपल्याला शिक्षणाचे नाविन्यपूर्ण मॉडेल्स तयार करावे लागतील, दर्जेदार शिक्षण प्रत्येकाला उपलब्ध करून देणे हे सरकारसमोर आव्हान आहे. त्यासाठी देशाला अनेक धोरण अवलंबावे लागणार आहे. मुलांमधील परीक्षेची चिंता आणि तणाव यावर बोलताना ते म्हणाले की, मुलांच्या समस्यांवर मात करण्यासाठी तज्ज्ञांचा एक गट तयार केला जाणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
206,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा