विद्यार्थ्यांना भडकवल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊला अटक

विद्यार्थ्यांना भडकवल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊला अटक

सोमवारी ३१ जानेवारी रोजी राज्यात काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या यासाठी आंदोलन केले. या विद्यार्थ्यांना भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठकला अटक करण्यात आली आहे. हिंदुस्थानी भाऊ विरोधात विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज ११ वाजता हिंदुस्तानी भाऊला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सोमवारी राज्यात अनेक शहरांमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर हे विद्यार्थ आंदोलन करण्यासाठी पोहचले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली आहे.

हिंदुस्थानी भाऊ माध्यमांशी बोलताना म्हणाला होता की, “मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. ज्या वेळी समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी गरज लागते त्यावेळी मी उभा राहतोय. गेल्या काही महिन्यांपासून दहावी- बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. सरकारने त्यांचा विचार केला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी डिप्रेशनमध्ये गेले, काही विद्यार्थ्यांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी आपण एका व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आंदोलन करावे असे आवाहन केल्याचे सांगितले. दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असेही हिंदुस्थानी भाऊने सांगितले.

हे ही वाचा:

नवाब मलिकांवर सात दिवसात गुन्हा दाखल होणार

Budget 2022: आज सादर होणार अर्थसंकल्प; या क्षेत्रांना मिळू शकते प्राधान्य

Budget 2022: विकास दर ९.२%, महागाईत घट! काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल?

हिंदुस्थानी भाऊ’गर्दी’ने आणला नाकात दम

विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करावी, फी माफ करावी अशा काही मागण्या हिंदुस्थानी भाऊने मांडल्या आहेत. त्याने या संबंधीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता.

Exit mobile version