खंडणी मागणारी धनंजय मुंडे यांची मेहुणी

खंडणी मागणारी धनंजय मुंडे यांची मेहुणी

महाविकास आघाडीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी एका परिचित महिलेची खंडणी मागणी प्रकरणी तक्रार दाखल केली होती. ही परिचित महिला कोण आहे हे आता समोर आले आहे. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून मुंडेंची मेहुणी रेणू शर्मा ही आहे. रेणू शर्माला या प्रकरणी तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देत पाच कोटींच्या दुकानाची आणि महागड्या मोबाइलची मागणी रेणू शर्माने केली होती. रेणू शर्मा ही धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या बायकोची म्हणजेच करुणा शर्मा यांची बहीण आहे. रेणू शर्मा हीने काही दिवसांपूर्वी मुंडेंच्या विरोधात बलात्कार प्रकरणी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, काही दिवसांनी तिने ही तक्रार मागे घेतली.

यानंतर रेणू शर्माने ५ कोटी आणि महागड्या मोबाईलची मागणी केली होती. तसेच मागण्या पूर्ण न केल्यास सोशल मीडियावर बदनामी करून पुन्हा बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली होती. त्यानंतर मुंडेंनी ३ लाख आणि महागडा मोबाईल कुरियरने पाठवला. मग मुंडेंनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात परिचित महिलेबद्दल खंडणी मागितल्याची तक्रार नोंदवली.

हे ही वाचा:

खंडणी मागणाऱ्या महिलेला मुंडेंनी दिला महागडा मोबाईल आणि ३ लाख

‘अधिकाऱ्यांच्या बदलीचा प्रकार समोर आला पाहिजे’

…म्हणून अक्षय कुमारने मागीतली चाहत्यांची माफी

अबब! मविआच्या मंत्र्यांनी स्वतःवरील उपचारासाठी किती खर्च केला बघा?

त्यानुसार पोलिसांनी रेणू शर्माचा शोध घेतला आहे. रेणू शर्माला इंदूर येथून अटक करण्यात आली असून, तिला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंवर त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांनी देखील आरोप केले होते. मुंडेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच करुणा शर्मा यांनी माध्यमांसमोर देखील मुंडेंवर गंभीर आरोप केले होते.

Exit mobile version