महाविकास आघाडीचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांना मंगळवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने खळबळ उडाली. त्यांनी ताबडतोब ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंडे यांना छातीत थोडा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे रुग्णालयात पोहोचले. ४६ वर्षांचे असलेले धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरू असून टोपे यांनी डॉक्टरांची भेट घेऊन नंतर पत्रकारांना मुंडे यांच्या प्रकृतीची माहिती दिली. ते म्हणाले की, मुंडे यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत. त्यांचे एमआरआय केले आहे. परिस्थिती नियंत्रित आहे. मी मुंडे यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यांनी गप्पा मारल्या. डॉ. समधानी यांच्या देखरेखीखाली मुंडे यांच्यावर उपचार सुरू आहेत. बाकी सविस्तर माहिती ऑफिसमध्ये आल्यावरच देता येईल, असे टोपे म्हणाले.
हे ही वाचा:
चकितचंदू, जंत पाटील, दात आणि सुळे…
‘शरद पवार कधीही छत्रपती शिवरायांचे नाव घेताना दिसणार नाहीत; ते नास्तिक आहेत’
शिष्यवृत्तीचा तिढा अखेर मोदी सरकारने सोडवला!
शिवसेनेचा प्रवास ‘वसंत’ सेना ते ‘शरद’ सेना
हे नेमके कशामुळे घडले अशी विचारणा केल्यावर टोपे म्हणाले की, आज जनता दरबार होता. त्यासाठी मुंडे हे धावपळ करत होते. या ताणामुळे असे होऊ शकते. डॉक्टरांनी मला बोलावलेले आहे.
आता पुढील तीन चार दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात त्यांची पत्नी करुणा मुंडेने धनंजय यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. करुणा मुंडे या २०२४मध्ये निवडणुकीत उभ्या राहणार आहेत. मुंडे यांच्या अनेक पत्नी आणि सहा मुले असल्याचा दावाही त्यांनी केेला आहे. मुंडेवर असे आरोप झाल्यामुळे ते सार्वजनिक जीवनात थोडे मागे राहिले होते.