उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्या कारसेवेला हजर असल्याचा सादर केला पुरावा!

राम मंदिर आंदोलनाचा जुना फोटो ट्विटकरत फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्या कारसेवेला हजर असल्याचा सादर केला पुरावा!

अयोध्येत उद्या २२ जानेवारी रोजी प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी राम मंदिर आंदोलनावरून भाजप आणि उबाठा शिवसेना यांच्यात जुंपली होती.बाबरी मशीद पडली तेव्हा सत्ताधारी कुठे होते असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता.यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देताना म्हणाले होते की, आपण कारसेवेला हजर होतो परंतु शिवसेनेचे लोक कुठे दिसले नव्हते अशी टीका उपमुख्यंमत्री फडणवीसांनी केली.या वादात उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विट करत विरोधकांच्या आरोपाला लगाम घातला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी फोटो ट्विट करताना म्हटले की, जुनी आठवण…नागपूरहून प्रकाशित होणार्‍या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्‍या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली. तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (२२ जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे, असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

हे ही वाचा:

११० किलो फळफुलांचा अभिषेक, ८१ कलश पाण्याने शुद्ध केले राममंदिर!

लंडनच्या गल्ल्यांमध्ये ‘जय श्रीरामा’चा गजर!

सुशांतसिंह राजपूत आज ३८ वर्षांचा असता;बहिणीने नव्या पुस्तकातून जागवल्या आठवणी!

उद्धव ठाकरे यांना स्पीड पोस्टने निमंत्रण मिळाले!

दरम्यान, २२ जानेवारीला प्रभू राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.अयोध्या नगरी फळाफुलांनी सजली आहे.पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू रामाचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे.देशभरातील भाविक मोठ्या संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत.अयोध्येत येणाऱ्या भाविकांच्या सेवेत कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी प्रभू राम जन्मभूमी ट्रस्टकडून घेण्यात येत आहे.

Exit mobile version