देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ सापडलेली स्फोटकांनी भरलेली गाडी, मनसुख हिरेन हत्या, सचिन वाझेला अटक, परमबीर सिंग यांची उचलबांगडी आणि गृहमंत्र्यांवर झालेले वसुलीचे गंभीर आरोप. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे सर्व प्रकरण विधानसभा आणि बाहेरही चांगलंच लावून धरलं आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या नागपुरातील निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शनिवार २० मार्च रोजी एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहलं. त्या पात्रातून त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करायला सांगितले होते, असा खळबळजनक आरोप केला आहे. देशमुखांनी वाझेला मुंबईत १७५० बार आणि रेस्टॉरंट्स आहेत त्यातूनच ४०-५० कोटी जमा होतील असेही सांगितले. या प्रकारे वसुली कशी करावी याची माहितीही त्यांनी दिली असाही आरोप परमबीर सिंह यांनी केला. परमबीर सिंह यांनीं केलेल्या आरोपांनंतर सरकारमधील अनेक मंत्री नेते आणि खुद्द शरद पवार यांनी सुद्धा परमबीर सिंह यांना खोटारडे ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता परमबीर सिंह यांनी या सर्व प्रकारची सीबीआय कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करा

राज्याने दरोडे घातले तर तपास केंद्र सरकारलाच करावा लागेल

राज्यपालांनी सत्यकथन करणारा अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवावा

ज्युलिओ रिबेरोंकडून शरद पवारांच्या मागणीला केराची टोपली

देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर राज्य राखीव पोलीस दलाचे सशस्त्र जवान, शहर पोलीस दलाचे जवान आणि खासगी सुरक्षा रक्षक असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे. त्यात अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा आरोप करण्यात आला आहे. यासह अनेक गंभीर आरोप सिंग यांनी देशमुखांवर केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

Exit mobile version