मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यासाठी भारतीय जनता पार्टीकडून पोलखोल अभियान सुरु करण्यात आले आहे. मात्र, त्याआधीच भाजपाच्या रथाची तोडफोड झाली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कितीही तोडफोड केली तरी, आम्ही त्यांची पोलखोल करणारच, असे फडणवीस म्हणाले आहेत.
फडणवीस म्हणाले, कितीही त्यांनी तोडफोड केली तरी आम्ही पोलखोल करणारच. आम्हला याची कल्पना होती की, रथाची किंवा आमच्या साहित्याची तोडफोड होणार आहे. कारण आता त्यांचे भ्रष्टाचार बाहेर येणार म्हणून घाबरून आमच्या स्टेजची आणी रथाची तोडफोड होण हे अपेक्षित होत, तरीही आम्ही आमचे काम पुढे चालू ठेवणार असे ते म्हणाले आहेत. तसेच भाजपा नेते प्रवीण दरेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी मुंबईतील कांदिवलीमध्ये आंदोलन करत आहेत.
दरम्यान, चेंबूर आणि कांदिवली येथील पोलखोल रथाची आणि साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे. चेंबूरमधील भाजपाच्या पोलखोल रथाची तोडफोड केली आहे. तर दुसरीकडे, मुंबईतील कांदिवली येथे पोलखोल स्टेजची आणि साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
कांदिवलीनंतर चेंबूरमध्ये भाजपच्या पोल खोल अभियान रथाची तोडफोड
ईडीकडून ‘ऍमवे’ कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त
महापालिकेची पोल खोलच्या भीतीने शिवसैनिकांनी स्टेजची केली तोडफोड
मंगळवार, १९ एप्रिलला मुंबईतील कांदिवली येथे भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोल खोल करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला आहे. चेंबूरच्या पोलखोल रथाची तोडफोड महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा संशय भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे.