जलयुक्त शिवार योजना पुन्हा होणार सुरू

देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोल्यातून जलयुक्त शिवार संबंधी मोठी घोषणा केली आहे.

जलयुक्त शिवार योजना पुन्हा होणार सुरू

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अकोला येथे दौऱ्यावर गेले होते. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज अकोल्यातून जलयुक्त शिवार संबंधी मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार पुन्हा सुरू करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राज्यात महाविकास आघाडीपूर्वी भाजपाचं सरकार असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार नावाची योजना सुरू केली होती. ही देवेंद्र फडणवीस यांची एक महत्त्वकांक्षी योजना होती. मात्र, २०१९ ला महाविकास आघाडी सरकार सत्तेत येताच त्यांनी या योजनेला स्थगिती दिली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे.

कापसाला (Cotton) हमीभावापेक्षा जास्त दर देऊ असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. हमीभावापेक्षा कमी भाव झाला तर सरकार हमीभावानं खरेदी करेल असेही फडणवीस म्हणाले. सौरऊर्जा पंप देण्याचीही घोषणा त्यांनी केली. शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्याची घोषणा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी त्यांना आदिपुरुष चित्रपटावरून सुरू असलेल्या वादाबाबत विचारण्यात आले, मात्र त्यांनी माहिती नसल्याचे सांगत त्यावर प्रतिक्रिया दिली नाही.

हे ही वाचा:

धनुष्यबाणाचा निर्णय लांबणीवर

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नातवाबद्दल अशी टिपण्णी करणे योग्य नाही. एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी असेल मात्र दीड वर्षाच्या मुलावर बोलणे योग्य नाही. उद्धव ठाकरे यांनी आपले शब्द मागे घायला हवेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Exit mobile version