काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला पुराचा फटका बसला होता. त्यामध्ये अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या भागाचा दौरा केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही उपाययोजना सुचविणारे पत्र लिहिले आहे.
पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसामुळे पुराचा सामना करावा लागला होता. या भागामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी दौरा केला होता. पूरग्रस्तांच्या अडचणी, व्यथा, गरजा समजून घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक पत्र लिहिले आहे या पत्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी पुराच्या समस्येवर काही तातडीने करायच्या व काही दीर्घकालीन उपाय योजनांची बद्दल लिहिले आहे. या पत्राबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट देखील केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये तातडीने करावयाच्या काही उपाय योजनांबद्दल सुचविले आहे. यामध्ये विविध मुद्द्यांचा विचार करण्यात आला आहे. नागरिकांनी घरे स्वच्छ केल्यामुळे मधील छायाचित्र हेच पंचनामा पुरावा म्हणून ग्राह्य धरून मदत करण्यात यावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे. त्याबरोबरच जनावरांच्या मृत्यूची भरपाई देखील देण्यात यावी अशी देखील मागणी केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये बाराबलुतेदार मूर्तिकार कुंभार टपरीधारक हातगाडी धारक इत्यादी विविध समाजघटकांचा देखील विचार करण्यात आलेला आहे.
हे ही वाचा:
लखनऊमधील मंदिरे बॉंम्बने उडवण्याची निनावी धमकी
आजपासून भारत सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षस्थानी
बीसीसीआयने धमकावल्याचे माजी क्रिकेटपटूचे आरोप
राहुलची राहुलला ‘प्रेम’ळ चपराक
शिवाय या पत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काही दीर्घकालीन मुदतीचे उपाय देखील सुचवले आहेत. यामध्ये पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यात सोबतच कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला देखिल गती द्यावी अशी मागणी केली आहे. त्याबरोबरच नागरिकांचे कोयनानगर येथे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे अशी देखील मागणी करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रामधून विविध उपाययोजनांची चर्चा केली आहे. त्यासोबतच दीर्घकालीन उपाय योजना बाबत जेव्हा बैठकीचे नियोजन केले जाईल त्या वेळेला उपस्थित राहण्याचे आश्वासन देखील त्यांनी या पत्राद्वारे दिले आहे.