आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत त्यांनी मोठं आणि महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. २०२४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं. भंडारा जिल्ह्यातील लाखनी गावात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलं आहे.
रविवार, ३ डिसेंबर रोजी भंडाऱ्यातील लाखनी येथे भाजपाकडून दिवाळी मिलन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबोधित केलं. यावेळी २०२४ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोण शपथ घेणार? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना विचारला. तेव्हा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच नावं घेतलं. यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असा संकल्प यावेळी करण्यात आला.
हे ही वाचा:
अधिवेशनात पराभवाचा राग काढू नका
तेलंगणमधील पराभवाला स्वतः केसीआरच कारणीभूत
निकालाआधीच रेवंथ रेड्डी यांना भेटून पुष्पगुच्छ देणे भोवले
पाकिस्तानात दहशतवाद्यांकडून बसवर गोळीबार
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत थेट देवेंद्र फडणवीस यांना उतरवण्याचा संकल्प बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांकडून वदवून घेतला. या मेळाव्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तीन संकल्प दिले. त्यात मे महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील. त्यासाठी महाराष्ट्रातून ४५ खासदार निवडून पाठवायचे. भंडाऱ्यातील खासदार हा सर्वाधिक मतांनी निवडून पाठवायचा. आणखी एक संकल्प म्हणजे वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी सर्वांनी ताकद लावायची. आपले उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आणायचे, असं बावनकुळे म्हणाले.