देवेंद्र फडणवीस दंगलग्रस्त अमरावतीच्या दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीस दंगलग्रस्त अमरावतीच्या दौऱ्यावर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज (रविवार, २१ नोव्हेंबर) रोजी अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. फडणवीस हे सकाळी अमरावतीमध्ये दाखल झाले असून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. यावेळी फडणवीस हे अमरावतीमधील परिस्थीतीची पाहणी करणार आहेत आणि आढावा घेणार आहेत.

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी धार्मिक दंगली उसळलेल्या पाहायला मिळाल्या. या मध्ये प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार पाहायला मिळाला. या घटनांनंतर फडणवीस आता अमरावतीचा दौरा करून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत. यावेळी त्यांनी बजारपेठेत फिरून कट्टरपंथीयांनी नुकसान केलेल्या दुकानांची पाहणी केली. तर काही पिडीत कुटुंबांशीही त्यांनी संवाद साधला. या दौऱ्या दरम्यान दुपारी १२.३० वाजता फडणवीस पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

हे ही वाचा:

स्वदेशी आयएनएस विशाखापट्टणम नौदलात दाखल!

मानखुर्द रेल्वे स्थानकात हत्या, निष्काळजीपणामुळे आरपीएफ जवान निलंबित

आर्यनविरुद्ध कोणताही पुरावा रेकॉर्डवर नाही

३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल

गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील वातावरण फारच तापले आहे. सध्या हे वातावरण हळू हळू शांत होताना दिसत आहे. त्रिपुरा येथे न घडलेल्या एका घटनेची अफवा महाराष्ट्रात पसरल्यामुळे राज्यात काही ठिकाणी रझा अकादमी सारख्या कट्टरतावादी संघटनेच्या नेतृत्वात मुसलमान समाज रस्त्यावर उतरला. प्रामुख्याने नांदेड, मालेगाव आणि अमरावती या ठिकाणी हिंसा पाहायला मिळाली.

यावर हिंदू समाजाकडून प्रतिक्रिया उमटून उस्फुर्तपणे अमरावती बंदची हाक देण्यात आली. यावेळीही समाज आक्रमक झालेला पाहायला मिळाला. या बंडानंतर पोलिसांनी कारवाई करत काही जणांन्वर गुन्हे दाखल केले. यामध्ये भाजपाच्या काही नेत्यांचाही समावेश आहे. पोलिसांच्या या एक्ट्राफी कारवाईवर चांगलीच टीका झालेली पाहायला मिळाली.

तर खबरदारीचा उपाय म्हणून अनेक दिवस अमरावतीमधील इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. तब्बल सहा दिवस ही सेवा बंद होती. तर जिल्ह्यात संचारबंदीही लागू होती. ही आता हळू हळू शिथिल करण्यात येत आहे.

Exit mobile version