विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २० मे रोजी इंदापूरमधील नृसिंह देवाचे दर्शन घेतले. नृसिंह हे फडणवीस यांचे कुलदैवत आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण दरेकरणांसह अनेक भारतीय जनता पार्टीचे नेते होते. यावेळी फडणवीसांनी इंदापूरमधून माध्यमांशी संवाद साधला आहे.
खोत यांनी जी जागर सभा काढली त्या यात्रेसाठी गेलो असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीस म्हणाले, देवाकडे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी प्राथर्ना केली आणि नृसिंह देव लवकरच आशीर्वाद देईल असे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्ये दौऱ्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, राम भक्त अयोध्या दौऱ्यासाठी जातील तेव्हा त्यांचे स्वागतच झाले पाहिजे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल करत म्हणाले की, संजय राऊत हे महत्त्वाची व्यक्ती नाहीत. नाना पटोले यांना स्मृतीभ्रंश झाला असल्याची टीका त्यांनी केली. तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचाही समाचार घेतला. संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीवरुन विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, शरद पवारांची भूमिका कधी कुणाला कळली आहे का? असा टोला त्यांनी लगावला आहे. उलट संभाजीराजे यांना सन्मानाने राज्यसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.
हे ही वाचा:
मुंबई विमानतळावर मुंबई- बंगळुरू विमानाचे आपत्कालीन लॅन्डिंग
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित
जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला
आत्मनिर्भर 5G ची IIT मद्रासमध्ये यशस्वी चाचणी
पुढे फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांसाठी, १२ बलुतेदारांसाठी आणि जनतेसाठी या सरकारशी आम्ही लढतच राहणार असा, इशारा फडणवीसांनी दिला आहे.