सर्वोच्च न्यायालयाने दहा टक्के आर्थिक आरक्षण वैध असल्याचा निर्णय दिला आहे. या निर्णयाचे स्वागत केले जातं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. तसेच याचवेळी फडणवीसांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरसुद्धा टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे आरक्षण दिलं होतं त्याला न्यायालयाने वैध ठरवलं आहे. एकीकडे जातीय आधारवर आरक्षण तर आहेच. पण ज्या घटकांना आरक्षण मिळत नव्हतं आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना यामधून दहा टक्के आरक्षण मिळणार आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जोपर्यंत नव्याने मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आर्थिक आरक्षण मराठा समाजाला लागू असणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. हे आरक्षण लागू झाल्याने गरीब तरुणांचा शिक्षण आणि नोकरीचा मार्ग मोकळा होणार आहे. आजचा निर्णय हा माईलस्टोन ठरेल असं म्हणत फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. त्यांच्या यात्रा सुखरूप होवो आणि त्यांची व्यवस्था व्यवस्थित करू, त्यांनी सुद्धा त्यांचे कार्यक्रम कायदेशीर पद्धतीने करावेत, असंही फडणवीस त्यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
इंटरनॅशनल हलाल शो इंडियाच्या विरोधात आवाज बुलंद
‘अजित पवारांची कुणालाही गॅरेंटी नाही’
‘मराठी मुस्लिम संकल्पनेचा प्रचार करणारे तोतया’
एका लग्नाची पुढची गोष्टचा १२,५०० वा प्रयोग, राज-फडणवीस उपस्थित राहणार
तसेच त्यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्राच्या राजकारणावर होईल असं वाटणार नाही. त्यांची भारत जोडो यात्रा नाही तर मोदीजी हटाव यात्रा आहे. मात्र, मोदीजी लोकांच्या हृदयात आहेत, त्यामुळे याचा फायदा होणार नाही, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.