26 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणतुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही

तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही

Google News Follow

Related

आज गोरेगाव येथील हिंदी भाषिक संमेलनात बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ठाकरे सरकारवर तुटून पडले आहेत. तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली केल्याशिवाय देवेंद्र फडणवीस राहणार नाही असे म्हणत ते सरकारवर बरसले.

यावेळी बोलताना फडणवीसांनी कारसेवेच्या मुद्द्यावरुनही शिवसेनेवर निशाणा साधला. जेव्हा जेव्हा या देशाला कारसेवेची गरज पडेल तेव्हा आंदोलनात रस्त्यावर उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी अयोध्याला गेल्याचे बोललल्यावर कशी मिरची लागली. ‘मै तो अयोध्या जा रहा था, मै तो कारसेवा कर रहा था, मै तो मंदिर बना रहा था, तुझको मिरची लगी तो मै क्या करू?’ असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला.

हे ही वाचा:

‘तुम्ही वैयक्तिक टीका करता, आम्ही म्याव म्याव केलं तर चालत नाही?’

दहशतवाद्यांना कण्ठस्नान घालणारा हिंदू म्हणजे नरेंद्र मोदी

न्यूयॉर्कमध्यल्या सुपरमार्केटमध्ये गोळीबार; १० जण ठार

‘शिवसेना औरंगजेब सेना झाली आहे का?’

आम्ही सहलीला गेलो नव्हतो. ‘लाठी, गोली खायेंगे, मंदिर वही बनायेंगे’ असे म्हणत कारसेवेला गेलेलो. १९९२ साली मी आधी नगरसेवक झालो, मग मी ऍडव्होकेट झालो आणि डिसेंबर १९९२ मध्ये नगरसेवक ऍडव्होकेट देवेंद्र फडणवीस कारसेवेला गेला होता. त्याआधी १९९० च्या कारसेवेलाही गेलेलो. तेव्हा आमच्या कोठारी बंधूंवर गोळ्या चालल्या पण भगवा खाली येऊ दिला नाही, तेव्हा मी जेलमध्येही गेलो होतो. आम्ही त्या जेलमध्ये वाट बघत होतो. शिवसैनिक येतील. शिवसैनिक येतील पण शिवसैनिक आलेच नाहीत.

मी पाय ठेवला असता तरी बाबरी पडली असती असे उद्धव ठाकरे म्हणाले. आज माझे वजन १०२ किलो आहे. जेव्हा कारसेवेला गेलेलो तेव्हा १२८ किलो होते. पण उद्धवजींना या भाषेत कळणार नाही. सामान्य माणसाचा जर एफएसआय १ असेल तर मजाही एफएसआय १.५ होते आणि जेव्हा बाबरी पाडली तेव्हा २.५ एफएसआय होता. तुम्ही जे माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकाल पण लक्षात ठेवा हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली केल्याशिवाय राहणार नाही.

त्याआधी मी काश्मीरलाही गेलेलो. जेव्हा काश्मीरमध्ये जनतेला आवश्यकता वाटली तेव्हा गरज पडेल तेव्हा मंदिरात झोपलो, प्लॅटफॉर्म वर झोपलो. तेव्हा तुम्ही काय करत होतात? आम्ही सोन्याचा चमचा घेऊन आलेलो नाही. फाईव्हस्टार आंदोलने करत नाही असा टोला फडणवीसांनी लगावला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा