मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या संवाद दौऱ्याला सुरुवात झाली असून सध्या ते बीड जिल्ह्यातील वानगावमध्ये आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. एसआयटी चौकशी लावली आहे. पण इंचभरही मागे हटणार नाही, असं जरांगे पाटील म्हणाले. तसेच फडणवीस यांनी मला आत टाकून दाखवावेच, त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे त्यांना दिसेल. तुमचा सगळा सुपडा साफ होईल अशी आव्हानात्मक भाषा जरांगे यांनी केली आहे.
“माझी मान जरी कापून नेली, तरी एक इंचभर मागे हटणार नाही. पण त्यानंतर भावनिक लाट काय असते? हे देवेंद्र फडणवीसांना दाखवून देऊ. त्यांचा सगळा सुपडा साफ होईल. या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे, असा आरोप भाजपाकडून केला जातो. पण खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात खुलासा केला की, शरद पवार यांच आंतरवाली सराटीमध्ये अपमान झाला. त्यांना उभ्या आयुष्यात कुणी एवढं बोललं नसेल, तेवढं बोललं गेलं. तुम्हीच एका तोंडाने बोलता त्यांचा अपमान झाला आणि दुसऱ्या तोंडाने तेच मागे असल्याचे सांगता. पण आमच्या मागे-पुढे कुणीही नाही,” असेही जरांगे यांनी सांगितले.
हे ही वाचा:
भारतीय नौदलाचा खलाशी बेपत्ता, शोध मोहीम सुरु!
दिल्लीतील बदरपूरमध्ये कारचे नियंत्रण सुटून ट्रकला धडक, तीन जणांचा मृत्यू!
तीन मिनिटात ब्राह्मणांना संपवतो म्हणणारा अटकेत
टेक कंपन्यांना ‘एआय’ प्रोडक्ट लाँच करण्यापूर्वी घ्यावी लागणार परवानगी
मनोज जरांगे म्हणाले की, “माननीय न्यायालयाने आम्हाला शांततेत रास्ता रोको करण्याचे निर्देश दिले होते. तरीही आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आम्ही काहीही करणार नव्हतो. उपोषणाचा १५ वा दिवस असताना २२ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने १३ मार्चला पुढील तारीख दिली होती. पण एका रात्रीत गृहमंत्र्यांनी तारीख बदलून २३ फेब्रुवारी करून घेतली. त्यानंतर एका गुप्त बैठकीत ठराव झाला, मनोज जरांगेला १० टक्के आरक्षण स्वीकारायला लावा, नाहीतर त्याला गुंतवा. असा ठराव झाल्याचे कळल्यामुळे त्यादिवशी आमच्याकडून आक्रमक प्रतिक्रिया दिली गेली.”